टाटा मेमोरियल सेंटरमध्ये ‘या’ पदासाठी भरती सुरू, महिन्याला १ लाखांहून अधिक पगार

टाटा मेमोरियल सेंटरमध्ये ‘या’ पदासाठी भरती सुरू, महिन्याला १ लाखांहून अधिक पगार

TMC Mumbai Recruitment 2024: आज अनेकजण सरकारी नोकरीच्य (Govt job) शोधात आहेत. मात्र, या स्पर्धेच्या काळात सरकारी नोकरी मिळवणं हे फारच अवघड काम आहे. दरम्यान, तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहेत. ती म्हणजे, टाटा मेमोरियल सेंट (Tata Memorial Centre) मध्ये आता नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. दरम्यान, याच पदांची संख्या, वयोमर्यादा, भरतीसाठी आवश्यक असलेले अर्ज शुल्क याचविषयी जाणून घेऊ.

Sonalee Kulkarni : अवतरली सुंदरा! निळ्या सिल्क साडीत सोनाली कुलकर्णी

टाटा मेमोरियल सेंटरमध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू आहे. टाटा मेमोरियल सेंटरच्या अधिकृत वेबसाइटवर या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार https://tmc.gov.in/ या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 मे असेल. या पदभरतीसाठी उमेदवारांना फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा लागणार आहे. उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. महत्वाचं म्हणजे अर्धवट माहिती असलेले अर्ज किंवा चुकीची माहिती असलेले अर्ज नाकारले जातील, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

Horoscope Today : आजचे राशी भविष्य, नोकरीच्या ठिकाणी तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होईल 

पदांचा तपशील –
कनिष्ठ निवासी, वरिष्ठ निवासी, HBNI फेलोशिप या पदाच्या रिक्त जागांसाठी ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

पगार –
1. कनिष्ठ निवासी – जर उमेदवाराने एमबीबीएस केले असेल तर त्याला महिन्याला 1,00,800 रुपये प्रति महिना वेतन मिळेल. .
2. वरिष्ठ रहिवासी – जर उमेदवाराने MS/MD/DNB केले असेल तर त्याला 1,21,200 रुपये प्रति महिना वेतन मिळेल.
3. HBNI फेलोशिप पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा 56 हजार ते 1,32,000 रुपये वेतन मिळेल.

वयोमर्यादा –
या पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ४० वर्ष असावे.

अर्ज फी – रु 1000.

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 22 मे

अधिसूचना –
https://tmc.gov.in/m_events/Upload/02052024_8/482024.pdf

अर्ज करण्यासाठी लिंक –
https://tmc.gov.in/jrfapp/frm_registration.aspx

उमदेवरांना या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज करतांना अर्जासोबवत आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी. दिलेल्या मुदतीतच अर्ज करावा.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube