भाजप उमेदवाराचा मतदान केंद्रात घुसून राडा ! इव्हीएम फोडले, अधिकाऱ्याला मारहाण

  • Written By: Published:
भाजप उमेदवाराचा मतदान केंद्रात घुसून राडा !  इव्हीएम फोडले, अधिकाऱ्याला मारहाण

BJP candidate ‘vandalises’ EVM in Odisha -आज लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) सहाव्या टप्प्यासाठी देशातील 58 मतदारसंघात मतदान पार पडले. यामध्ये देशाची राजधानी दिल्लीच्या सर्व 7 जागांसह उत्तर प्रदेशातील 14, हरियाणातील सर्व 10 जागा, बिहार आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी आठ, ओडिशातील सहा, झारखंडमधील चार आणि जम्मू-काश्मीरमधील एका जागेचा समावेश होता. याचबरोबर ओडिसा विधानसभेसाठी मतदान पार पाडले आहे. पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी हिंसाचार झाला. तर ओडिसामधील भाजपच्या (bjp) विधानसभेच्या उमेदवारानी मतदान केंद्रात जावून गोंधळ घालत इव्हीएम मशीनची तोडफोड केली आहे. तर मतदान प्रक्रिया पार पाडणाऱ्या अधिकाऱ्याला मारहाण केली आहे. त्यामुळे येथील मतदान प्रक्रिया थांबविण्यात आली आहे.


राजकोटच्या गेमिंग झोनमध्ये भीषण आग, 24 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकल्याची भीती

भाजपचे उमेदवार प्रशांत जगदेव (Prasanta Jagadev) यांनी हे कृत्य केले असून, जगदेव यांना पोलिसांनी अटक केली आहे. खुर्दा जिल्ह्यातील बोलागड ब्लॉकमधील मतदान केंद्रावर शनिवारी मतदानाची प्रक्रिया सुरू होते. त्यावेळी प्रशांत जगदेव त्यांचे समर्थक हे मतदान केंद्रात आले. तेथील मतदान प्रक्रियावरून अधिकारी आणि जगदेव यांच्यात वाद झाले. त्यावरून जगदेव यांनी इव्हीएम मशीनची तोडफोड केली. तसेच निवडणूक अधिकारी यांनाही मारहाण केली आहे. यावेळी भाजपचे लोकसभेचे उमेदवार अपराजिता सारंगीही तेथे उपस्थित होते. त्यानंतर सारंगी आणि जगदेव हे आपल्या कारमधून निघून जात होते. त्यावेळी मतदान प्रक्रियेसाठी बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी जगदेव यांना ताब्यात घेतले आहे.

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे! पंतप्रधान मोदींचा मुक्काम, 80 लाखांचा हॉटेल मालकाला बुर्दंड


अनेक कारनाम्यांमुळे बिजेडीतून हकालपट्टी

प्रशांत जगदेव हे सिलिका मतदारसंघातून आमदार आहेत. ते बिजेडी पक्षाकडून निवडून आले आहेत. आमदारकीच्या काळात अनेक वाद जगदेव यांनी ओढून घेतले आहेत. भाजपचे नगराध्यक्षांना मारहाण केल्याप्रकरणी जगदेव हे तुरुंगात गेले होते. तर 2022 मध्ये जगदेव यांनी आपली गाडी भाजपच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर घातली होती. त्यात पंधरा कार्यकर्ते जखमी झाले होते. या कारनाम्यांमुळे बिजेडीतून जगदेव यांची हकालपट्टी करण्यात आली होती. परंतु ते भाजपमध्ये गेले. भाजपने त्यांना खुर्दा विधानसभा मतदारसंघात तिकीट दिले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube