दिंडोरीची जागा माकपला सोडा, अन्यथा स्वतंत्रपणे लढू…; जेपी गावितांनी वाढवलं मविआचं टेन्शन

दिंडोरीची जागा माकपला सोडा, अन्यथा स्वतंत्रपणे लढू…; जेपी गावितांनी वाढवलं मविआचं टेन्शन

JP Gavit on Dindori LokSabha : सांगलीच्या जागेचा तिढा कायम असतांनाच आता दिंडोरी लोकसभा मतदारसंघातही (Dindori Lok Sabha Constituency) माकपने महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) डोकेदुखी वाढवली आहे. दिंडोरीमध्ये महाविकास आघाडीने भास्कर भगरे यांना उमेदवारी दिली आहे. या जागेसाठी माकप आग्रही होता. मात्र, हा मतदारसंघ माकपच्या वाट्याला न आल्याने माजी आमदार जे.पी.गावित (JP Gavit) यांनी माकप दिंडोरी लोकसभा स्वतंत्रपणे लढणार असल्याची घोषणा केली.

अनेकांना संसदरत्न मात्र शिरूरच्या खासदारांकडून त्याचं भांडवल; आढळरावांची कोल्हेंवर टीका 

दिंडोरी लोकसभा स्वतंत्रपणे लढणार – गावित
महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या वेळी माकपने परभणी, पालघर आणि दिंडोरी या लोकसभा मतदारसंघात जागा देण्याची मागणी केली होती. मात्र, राज्यात माकपसाठी एकही जागा सोडली नाही. दिंडोरीत भाजपने खासदार डॉ. भारती पवार यांना उमेदवारी जाहीर केली. तर त्यांच्या शरदचंद्र पवार गटाकडून भास्कर भगरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. या जागेसाठी माकप आग्रही होतं. मात्र, जागावाटपात ही जागा शरद पवार गटाला दिली. त्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी गावित यांची भेट घेऊन उमेदवारी अर्ज भरण्याची विनंती त्यांना केली होती. त्यानंतर एका जाहीर सभेत गावित यांनी माकपला राज्यात एकही जागा न मिळाल्याने दिंडोरी लोकसभा स्वतंत्रपणे लढणार असल्याचं स्पष्ट केलं.

मला अटक करणं हा एक कट होता, डीएस कुलकर्णींचा गंभीर आरोप 

पाटील यांचा प्रयत्न फसणार!
गावित यांच्या घोषणेनंतर तातडीने शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गावित यांची भेट घेत समजूत काढली. पाटील यांच्या चर्चेनंतर देखीलजे पी गावित हे निवडणूक लढवणार असल्याच्या भूमिकेवर ठाम आहे. दिंडोरीची जागा माकपला सोडावी, अन्यथा आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची भूमिका घेऊ, असं गावित म्हणाले.

दरम्यान, गावित यांनी सातत्याने भाजपविरोधात लढा दिला आहे. महाविकास आघाडीच्या प्रत्येक आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. आता दिंडोरीतून आपण लढणणार असल्यचाी भूमिका गावित यांनी घतेल्यानं शरद पवार गटाची डोकेदुखी वाढली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज