मुख्यमंत्र्यांनी राखली प्रतिष्ठा, कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंची हॅट्ट्रिक

मुख्यमंत्र्यांनी राखली प्रतिष्ठा, कल्याणमध्ये  श्रीकांत शिंदेंची हॅट्ट्रिक

Kalyan Loksabha Election Result 2024 : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात (Kalyan Loksabha Election) पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी विजय मिळवला आहे. या मतदारसंघातून तिसऱ्यांदा श्रीकांत शिंदे यांनी विजय मिळवला आहे.

शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदा होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा आपल्या बालेकिल्यात वर्चस्व सिद्ध करणार का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होते. मात्र आज जाहीर झालेल्या निकालात श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटाचे उमेदवार वैशाली दरेकर-राणे यांचा पराभव करत दोन लाखांहून जास्त मताधिक्य मिळवत श्रीकांत शिंदे यांनी विजयाची हॅट्ट्रिक साधली.

कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांचा पराभव करण्यासाठी उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीतील दिग्गज नेत्यांनी प्रचार केला होता मात्र एकनाथ शिंदे यांनी आपल्या बालेकिल्यात पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध करत श्रीकांत शिंदे यांच्या विजयात महत्वाची भूमिका पार पाडली.

पाचव्या टप्प्यात झालेल्या निवडणुकीत या मतदारसंघात 50.12 टक्के मतदान झाला असून त्यामध्ये पुरुष मतदारांचे प्रमाण 52.19 टक्के तर महिला मतदारांचे प्रमाण 47.75 टक्के आणि इतर मतदारांचे प्रमाण 21.63 टक्के होता. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रातून 52.19 टक्के झाले तर सर्वात कमी मतदान अंबरनाथ विधानसभा क्षेत्रातून 47.06 टक्के इतके झाले . 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी 4 टक्के मतदान जास्त होते.

श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी या मतदारसंघात अनेक नाट्यमय घडामोडी घडत होते. कल्याण मतदारसंघात यावेळी भाजपकडून देखील निवडणूक लढवण्याची जोरात तयारी सुरू होती. त्यामुळे कल्याण मतदारसंघात महायुतीकडून भाजप की शिवसेना कोण उमेदवार देणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होते. मात्र शेवटी, एकनाथ शिंदे यांनी महायुतीचे उमेदवार म्हणून कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा केली होती.

ठाण्यात शिंदेच किंग! नरेश म्हस्केंचा दणदणीत विजय, उद्धव ठाकरेंना धक्का

बाळासाहेब ठाकरे आणि अनंत गीते यांच्या नावावरून राजकारण सुरू करणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कल्याण लोकसभा मतदारसंघ बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघात अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ, उल्हासनगर विधानसभा मतदारसंघ, कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ, डोंबिवली विधानसभा मतदारसंघ, कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ आणि मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदा होत असलेल्या निवडणुकीमुळे ही निवडणूक एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube