निवडणुकीत आतापर्यंत 8889 कोटींच्या वस्तू जप्त, रोकड आणि ड्रग्जचा आकडा मोठा

निवडणुकीत आतापर्यंत  8889 कोटींच्या वस्तू जप्त, रोकड आणि ड्रग्जचा आकडा मोठा

Lok Sabha elections 2024 : देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) धामधूम सुरू आहे. पाचव्या टप्प्यातील निवडणुकीसाठी अवघे दोन दिवस बाकी आहे. दरम्यान, मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमदेवारांकडून मतदारांना मोठी प्रलोभणं दिली जातात. त्याविरोधात निवडणूक आयोगाने (Election Commission) कठोर पावले उचलली आहेत. आयोगानाने आतापर्यंत केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत 8,889 कोटी रुपये रोख आणि ड्रग्ज जप्त केले आहेत.

…. तेव्हा स्वप्न पूर्ण करण्यासाठी असा होता अनिल कपूर यांच्या मास्टर प्लॅन 

मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त

निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, लोकसभा निवडणुकीत प्रलोभणं दाखवणाऱ्यांवर भारतीय निवडणूक आयोग कठोर कारवाई करत आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाने अवैध पैसा, अंमली पदार्थ, मोफत बियाणे आणि मौल्यवान धातूंच्या जप्त केलं. ड्रग्ज, मद्य, मौल्यवान धातू, मोफत वस्तू आणि रोख रक्कम हे सगळं निवडणुकांवर प्रभाव टाकते. त्यामुळं निवडणुकांवेळी मतदार कोणत्याही आमिषाला बळी पडू नये म्हणून आयोगाने काळजी घेतली.

वादळी वाऱ्यामुळे राज्यात पुन्हा होर्डिंग कोसळलं, अनेक गाड्यांचे नुकसान

निवडणूक आयोगाने सांगितले की, जप्त केलेल्या वस्तूंपैकी सर्वात मोठा वाटा म्हणजे, 45 टक्के वाटा हा अमली पदार्थांचा होता. सुमारे 3,959 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. आतापर्यंत 1260.33 कोटी किमतीचे मौल्यवान धातू जप्त करण्यात आले आहेत, तर 2006.56 कोटी रुपयांच्या मोफत वस्तू आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

जप्त केलेला पैसा आणि ड्रग्जचा वापर लोकसभा निवडणुकीत मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी करण्यात येणार होता, असं आयोगाने सांगितले

निवडणूक आयोगाने मनी पॉवरविरोधात केलेल्या कारवाईत 8889 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. ज्यामध्ये निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या वेळी जप्तीचा आकडा लवकरच 9,000 कोटी रुपयांच्या पुढे जाईल असे म्हटले आहे.

गुजरातमध्ये सर्वात जप्ती झाली आहे. एकूण 1461.73 रुपये गुजरातमधून जप्त झालेत.
तर राजस्थानमध्ये 1133.82 कोटी रुपये आणि पंजाबमधून 734.54 कोटी रुपये जप्त झाले.

 

ECI कारवाई करत राहणार…
निवडणूक आयोगाने सांगितले की, लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर, म्हणजे पाचव्या टप्प्याचे मतदान सुरू होण्यापूर्वीच, 8889 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील एकूण जप्तीपेक्षा ही रक्कम कितीतरी पटीने जास्त आहे.
आयोगाच्या म्हणण्यानुसार, स्थानिक लोक, आयकर, प्राप्तिकर गुप्तचर सर्वेक्षण विभाग, सीमाशुल्क, उत्पादन शुल्क, स्थानिक पोलीस आणि निमलष्करी दलाचे अधिकारी यांच्या सतर्कतेने आणि समन्वयाने निवडणूक आयोग कठोरपणे अशाच कारवाई करत राहील.

106 सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाई
गेल्या काही वर्षांत गुजरात, पंजाब, मणिपूर, नागालँड, त्रिपुरा आणि मिझोराममध्ये निवडणुकांदरम्यान मोठ्या प्रमाणात जप्ती करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी गेल्या महिन्यात सार्वत्रिक निवडणुका जाहीर करताना मनी पॉवर हे मोठे आव्हान असल्याचे सांगितलं होतं. त्यादरम्यान निवडणूक आयोगाने निवडणूक प्रचारात राजकीय नेत्यांना मदत करणाऱ्या सुमारे 106 सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube