एका म्यानात दोन तलवारी नकोयत… पंकजा मुंडेंचा पराभव ‘फडणवीस आणि धनंजय’ हेच करतील
पुणे : बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव त्यांचे बंधू धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच करतील, असा खळबळजनक दावा परभणीचे खासदार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजय जाधव यांनी केला आहे. ते लेट्सअप मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते. (Pankaja Munde will be defeated in Beed by her brother Dhananjay Munde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis.)
संजय जाधव म्हणाले, ज्याप्रमाणे परभणीत ओबीसी विरुद्ध ओपन अशी निवडणूक झाली, त्याचप्रमाणे बीडमध्येही ओबीसी विरुद्ध ओपन निवडणूक झाली. त्यामुळे मला वाटते की बीडमध्ये पंकजा ताईंना हरवण्यात धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेच वाटा उचलतील. कारण एका म्यानामध्ये दोन तलवारी नको आहेत. धनंजय मुंडे आणि पंकजा ताई हे दोघे एकाच ठिकाणी राहणे हे कोणालाच परवडणारे नाही.
भाजपसाठी जुळून आली समीकरणे… पालघरमध्ये डॉ. हेमंत सावरांना विजयाची संधी
धनंजय मुंडे यांनाही वाटते की माझ्यात वाटेकरी कशाला. मग काही तरी वादग्रस्त विधाने करुन मतदान विरोधात घालवण्याचा प्रयत्न झाला, असे वाटते. त्यामुळे तिथे बजरंग सोनावणे निवडून येतील अशी परिस्थिती आहे, असाही दावा संजय जाधव यांनी केला. बीड आणि परभणी हे दोन्ही मतदारसंघ शेजारी-शेजारीच असल्याने जाधव यांच्या दाव्याला महत्व प्राप्त झाले आहे.
दोघांना चिरडणाऱ्या, अलिशान गाड्यांचे शौकीन 17 वर्षीय मुलाचे वडिल विशाल अग्रवाल कोण?
परभणीमध्येही जातीच्या मुद्द्यावर फिरली निवडणूक :
महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या प्रश्नाची आणि मराठा विरुद्ध ओबीसी वादाची झळ सर्वात जास्त कुठे जाणवली असेल तर ती मराठवाड्यामध्ये. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मराठवाड्यात जातीय ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात झाल्याचे मान्य केले. मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये मराठा आरक्षण या प्रश्नाची दाहकता जास्त होती. यातही महायुतीकडून बीडमध्ये वंजारी आणि परभणीमध्ये धनगर तर महाविकास आघाडीकडून मराठा उमेदवार मैदानात होते. त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद चांगलाच पेटलेला पाहायला मिळाला. या दोन्ही जिल्ह्यांमधील निवडणूकही याच मुद्द्यांवर फिरताना दिसली.