राहुल गांधींचा स्क्रिप्ट रायटर भाजपचा; प्रकाश आंबेडकरांची घणाघाती टीका

राहुल गांधींचा स्क्रिप्ट रायटर भाजपचा; प्रकाश आंबेडकरांची घणाघाती टीका

Prakash Ambedkar On Rahul Gandhi : इंडिया आघाडीश (India Alliance) जागावाटपावरून फिस्कटल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Alliance) नेते प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) वेगळी वाट निवडली. त्यांनी स्वतंत्रपणे आपले उमेदवार उभे केले. तेव्हापासून ते सातत्याने कॉंग्रेसवर (Congress) टीका करत आहे. त्यांनी अनेकदा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर निशाणा साधला. तर आता राहुल गाधींवर टीकास्त्र डागलं. राहुल गांधींचा (Rahul Gandhi) स्क्रिप्ट रायटर भाजपचा असल्याची टीका त्यांनी केली.

नागपूरला सर्वात कमी मतदान, फटका कुणाला? टफ फाइट असलेल्या चंद्रपुरात किती टक्के मतदान ? 

वंचितची आज मोंढा येथे प्रचारसभा झाली. या सभेला संबोधित करतांना आंबेडकर म्हणाले, इलेक्ट्रोल बॉन्ड्स प्रकरणात काँग्रेसचे दुर्दैव आहे. सर्व कागदपत्रे आल्यानंतर काँग्रेस पंतप्रधान मोदींवर तुटून पडले, असं वाटलं. मात्र, मात्र, काँग्रेस गप्प आहे. बिचाऱ्या राहुल गांधींचेही वाईट वटाते. बुद्धीमान असूनही त्यांना असिस्टंट लागतो. राहुल गांधींचा स्क्रिप्ट रायटर हा भाजपचा असल्याची मला शंका येते. कारण, 4000 किलोमीटर चालून आला अन् मुंबईच्या सभेत आमची लढाई मोदींशी नसून अदृश्य शक्तींसी असल्याचा म्हणाला. त्यांच्या एका वाक्याने सर्व कष्टावर पाणी फिरले, अशा शब्दात आंबेडकरांनी टीका केली.

अमित शाहांनी भरला उमेदवारी अर्ज, म्हणाले गांधीनगरमधून उमेदवारी हे माझ…. 

पुढं बोलतांना ते म्हणाले, इलेक्ट्रोल बॉन्ड्स प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे कौतुक केले पाहिजे. त्यांनी तंबी दिल्यानंतर बँकेने सर्व कागदपत्रे बाहेर काढली. यामध्ये भाजप आणि काँग्रेसला पैसा मिळाला. ज्या फार्मास्युटिकल कंपन्यांच्या औषधांमुळे लोकांचा जीव गेला, त्या कंपन्यांना बंदी घातली. यानंतर या कंपन्यांनी 300 ते 400 कोटी रुपयांचे रोखे घेऊन भाजपला दिले. यानंतर या कंपन्यांची औषधे पुन्हा बाजारात आली. लोक मेले तरी चालतील पण, पक्षाच्या तिजोरित पैसे आले पाहिजे, अशी भाजपची भूमिका असल्याचं आंबेडकर म्हणाले.

सध्याची सत्ता निजामी मराठ्यांची
काँग्रेस, भाजप किंवा अन्य कोणत्याही पक्षाने गरीब मराठ्याला लोकसभेची उमेदवारी दिला नाही. मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरू असताना या नेत्यांनी पाठिंबा का दिला नाही? असा सवाल मराठा समाजाने विचारायला हवा, सध्याची सत्ता निजामी मराठ्यांची आहे. उपेक्षितांना ते जवळ करायला तयार नाहीत, असेही आंबेडकर म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube