कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी, मंदिरात मास्कसक्ती

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी, मंदिरात मास्कसक्ती

मुंबई : देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रार्दुभाव वाढला आहे. यामुळे राज्यांना खबरदारीच्या सुचना देण्यात आल्या आहेत. यातच धार्मिक स्थळावर देखील काही निर्बंध लावण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने अनेक मंदिरांमध्ये मास्क सक्ती करण्यात आली आहे. परदेशातून येणाऱ्या लोकांची टेस्ट केली जात आहे. शिवाय परदेशातून येणाऱ्या प्रत्येक पॉझिटिव्ह रुग्णाचं जिनोम सिक्वेन्सिंग व्हावं, असे आदेशही केंद्र सरकारने दिले आहेत.

दरम्यान राज्यातील अनेक मंदिरांमध्ये मास्क सक्ती करण्यात आली आहे. नेमकं कोणती आहेत ही मंदिर आपण जाणुन घेऊ

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी मास्क लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सप्तशृंगी : नाशिकमधल्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी जात असाल तर मास्क घेऊन जा. कारण सप्तशृंगी मंदिर परिसरात नो मास्क, नो एंट्री! या नियमाची कडक अंमलबजावणी केली जात आहे.

अक्कलकोट : अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिरातही मास्क घालूनच मंदिरात प्रवेश करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जे भाविक मास्क न घालता मंदिरात येत आहेत, त्यांना मंदिरातर्फे मास्कचे वाटप करण्यात येत आहे.

कोल्हापुर : कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरातही मास्क शिवाय प्रवेश नाहीये. भाविकांना आपआपसात अंतर राखूनच राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. भाविकांना देव दर्शनासाठी रांगेत उभ्या असणाऱ्या भक्तांनाही नियमांचं पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

देहू : देहूच्या मुख्य मंदिरात भाविकांना मास्कसक्ती नाही, मात्र कोरोना नियमांचं पालन करण्याच्या सूचना देहू संस्थानने दिल्या आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube