ब्रेकिंग! सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी कोर्टाचा धक्कादायक निर्णय

2008 Malegaon Bomb Blast Case Verdict Update : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा आज निकाल जाहीर झाला आहे. सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता. संशयाच्या आरोपांवर आरोपींना शिक्षा होऊ शकत नाही, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे.
आजच्या सुनावणीत काय घडलं?
कर्नल पुरोहित यांनी आरडीएक्सची व्यवस्था केली होती, असा आरोप केला गेला. परंतु प्रसाद पुरोहित यांनी आरडीएक्स आणल्याचा पुरावा रेकॉर्डवर नसल्याचं न्यायालयाने म्हटलं. बाईक व्यतिरिक्त काही ठिकाणी बॉम्ब होते, स्फोटात 95 जण जखमी झाले. दगडफेक झाली होती, गोळीबार सुद्धा झाला होता, असा युक्तिवाद सरकारने केला. बाईकवर ब्लास्ट झाला नाही. पंचनामा व्यवस्थित झाला नाही. साध्वी यांच्या नावाने बाईकचा चेसिस नंबर व्यवस्थित नव्हता, असं कोर्टाने म्हटलंय. कट शिजला हे सिद्ध करण्यासाठी आवश्यक पुरावे नाहीत. मोबाईलमधूनही काही पुरावे नाही, असं देखील न्यायालयाने म्हटलंय. UAPA लावणं योग्य नाही. बाईक साध्वी यांची होती हे सिद्ध होत नाही. आरडीक्स आणि बॉम्ब पुरोहित यांनी आणल्याचा पुरावा नाही, असं न्यायालयाने म्हटलं आहे. स्फोटासाठी पुराहित यांनी संस्थेची रक्कम वापरल्याचा पुरावा नाही. आरोपींमध्ये बैठक झाल्याचाही पुरावा नाही, असं देखील कोर्टाने म्हटलं आहे.
NIA Court acquits all accused in Malegaon blast case, including Sadhvi Pragya Singh, Lt Colonel Purohit and others
On September 29, 2008, six people were killed and several others injured when an explosive device strapped to a motorcycle detonated near a mosque in Malegaon City,… pic.twitter.com/PYsIBvrvc4
— ANI (@ANI) July 31, 2025
29 सप्टेंबर 2008 रोजी रमजान महिन्यात मालेगाव शहर हादरवणाऱ्या भीषण बॉम्बस्फोटाला (Malegaon Bomb Blast Case) आज 17 वर्षं पूर्ण झाले. या स्फोटात सहा निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर 100 पेक्षा अधिक लोक गंभीर जखमी झाले होते. भीकू चौकाजवळ एका दुचाकीवर ठेवण्यात आलेल्या बॉम्बचा स्फोट झाला होता. या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. अनेक कुटुंबं अक्षरशः उद्ध्वस्त झाली होती. या प्रकरणाची सुनावणी आज मुंबईतील (Mumbai) एनआयएच्या विशेष न्यायालयात (NIA Court) पार पडली.
मालेगावात 17 वर्षांपूर्वी काय घडलं होतं?
मालेगावमध्ये 2008 साली मशिदीजवळ उभ्या असलेल्या मोटरसायकलमध्ये बॉम्ब स्फोट झाला होता. रमजान महिन्यामुळे परिसरात प्रचंड गर्दी होती. या स्फोटात सहा नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर 100 पेक्षा अधिक लोक जखमी (Malegaon Bomb Blast Case) झाले. सुरुवातीला महाराष्ट्र एटीएसने तपास सुरू केला आणि नंतर 2011 मध्ये तो राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) सोपवण्यात आला. या प्रकरणात भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी यांच्यावर मुख्य आरोप ठेवण्यात आले आहेत. त्याशिवाय काही आरोपी अजूनही फरार आहेत. त्यात रामजी कालसंग्रा, संदीप डांगे, प्रविण तकलकी, शामजी साहू आणि राकेश धावडे यांचा समावेश आहे.
भाजपसोबत युती सर्वात मोठी चूक! अखेर महादेव जानकरांच्या मनातली खदखद आली समोर
तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया
सुरुवातीच्या तपासात एटीएसने आरोप केला होता की, स्फोटकांनी भरलेली जी दुचाकी सापडली. ती साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्या नावावर होती. स्फोटासाठी RDX वापरण्यात आल्याचंही तपासात निष्पन्न झालं. एटीएसने दावा केला की, आरोपींनी 2008 च्या सुरुवातीला फरीदाबाद, भोपाळ, नाशिक येथे बैठका घेऊन स्फोटाचा कट रचला. RDX जम्मू-काश्मीरमध्ये पोस्टिंग दरम्यान मिळवण्यात आलं, आणि नंतर ते सुधाकर चतुर्वेदीच्या घरी बॉम्ब तयार करण्यात वापरलं गेलं. या स्फोटाचा उद्देश मुस्लिम समाजात भीती निर्माण करून तणाव पसरवण्याचा आहे, असा दावा एनआयएनं न्यायालयात केला होता.
“हायवेवर अचानक ब्रेक लावणे हा निष्काळजीपणाच, इमर्जन्सीतही..”, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
न्यायालयीन घडामोडी
2018 मध्ये या प्रकरणात प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झाली. न्यायालयानं 323 साक्षीदार तपासले, मात्र त्यातील 37 साक्षीदारांनी आपली जबाबे बदलली. एटीएसने मोक्का (MCOCA) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता, पण तो नंतर मागे घेण्यात आला. साध्वी प्रज्ञासिंह यांनी आपल्याला राजकीय हेतूनं गोवलं गेलं असल्याचा दावा केला आहे. कर्नल पुरोहित यांनीही आपल्या विरोधात ठोस पुरावे नसल्याचं म्हटलं आहे. एनआयएने साध्वी प्रज्ञा यांना आरोपींच्या यादीतून वगळण्याची मागणी केली होती, पण न्यायालयानं ती फेटाळली आणि त्यांच्याविरोधात आरोप चालू ठेवले.
आरोप काय?
सात आरोपींवर युएपीए (UAPA) अंतर्गत दहशतवादी कृत्य करणे, त्याचा कट रचना, हत्या, हत्येचा प्रयत्न आणि धार्मिक तेढ वाढवण्याचे आरोप आहेत. विशेष म्हणजे एनआयएने या सर्व आरोपींसाठी मृत्युदंडाची मागणी केली आहे. याप्रकरणी आज (31 जुलै) विशेष NIA न्यायालय आपला निकालाने दिला आहे.