मोठी बातमी! इचलकंरजी – कोल्हापूरमध्ये भाजपचे 4 उमेदवार विजयी
Ichalkaranji Municipal Corporation Election : राज्यातील 29 महापालिका निवडणुकीसाठी मतमोजणी सुरु असून या निवडणुकीत कोण
Ichalkaranji Municipal Corporation Election : राज्यातील 29 महापालिका निवडणुकीसाठी मतमोजणी सुरु असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे निकालात भाजपने आघाडी घेतली असून इचलंरजीमध्ये भाजपचे 4 उमेदवार विजयी झाले आहे. इचलंरजीसह कोल्हापूरमध्ये देखील भाजपचे 4 उमेदवार विजयी झाले आहे. तर इतर महापालिकेत भाजपचे उमेदवार आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे.
छत्रपती संभाजीनगर भाजपापेक्षा AIMIM आघाडीवर
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे सुरुवातीचे कल समोर येत असून एमआयएमने पाच जागांवर आघाडी घेतली आहे तर भाजप 4 जागांवर आघाडीवर आहे. तर दोन्ही शिवसेना 3-3 जागांवर आघाडीवर आहे.
अकोल्यात भाजप आघाडीवर
अकोल्यात पोस्टल मतमोजणीत भाजप 10 जागांवर तर काँग्रेस 3 जागांवर आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे.
अकोला महापालिका आघाडी कोण?
भाजप : 10
काँग्रेस : 3
उबाठा : 1
