देशाच्या इतिहासात प्रथमच मिळणार पाण्याचा ‘सातबारा’; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

Chandrashekhar Bawankule On Water Satbara :  जमिनीच्या सातबारा प्रमाणे आता राज्यात पाण्याचा सातबारा देखील मिळणार असल्याची माहिती

Chandrashekhar Bawankule On Water Satbara

Chandrashekhar Bawankule On Water Satbara :  जमिनीच्या सातबारा प्रमाणे आता राज्यात पाण्याचा सातबारा देखील मिळणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून देण्यात आली आहे. राज्यात पाण्याचा साठा किती आहे आणि त्याचा वापर कसा होतोय याची नोंद पाण्याच्या सातबारात ठेवली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पाण्याचा गैरवापर रोखण्यासाठी आणि वॉटर इकॉनॉमी मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सरकार आता वॉटर अकाऊंटिंग फ्रेमवर्क (Water Accounting Framework) आणि वॉटर बॅलन्सशीट संकल्पनेवर काम करत आहे. या संकल्पनेनुसार, राज्य सरकारकडून पाण्याचे ऑडिट करण्यात येणार आहे. राज्य सरकार आता गाव व शहरातील पाण्याच्या स्त्रोत, पाण्यचाी उपलब्धता, वापर, गरज लक्षात घेऊ पाण्याचा ताळेबंद तयार करणार आहे. यासाठी लवकरच शास्त्रीय पद्धती विकसित करुन जल सातबाऱ्याची प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती देखील सध्या समोर येत आहे.

काय म्हणाले महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे ?

पाण्याचाही सातबारा !

•विकसित महाराष्ट्राच्या दिशेने पहिले पाऊल

जमिनीचा 7/12 सगळ्यांना माहीत आहे. मात्र, आता जल सातबारा या अभिनव संकल्पनेला विकसित (Developed Maharashtra) करण्याची तयारी महसूल विभाग करतो आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या नेतृत्वातील विकसित महाराष्ट्राच्या वाटचालीतील जल 7/12 देशातील पहिले अभिनव पाऊल आहे.

गाव व शहरातील पाण्याचा स्रोत, पाण्याची उपलब्धता, वापर, गरज लक्षात घेऊन पाण्याचा ताळेबंद तयार करण्याची शास्त्रीय पद्धती विकसित करून त्याची प्रायोगिक तत्वावर अमलबजावणी करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील एक गाव व नगर परिषदेत हा पथदर्शी प्रकल्प राबविला जाणार आहे.

मंत्रालयातील माझ्या दालनात झालेल्या बैठकीला पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, ग्रामविकास विभागाचे सचिव चंद्रकांत पलकुंडवार, जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापडकर यांच्यासह एक्वेरिएम संस्थेचे प्रमुख सुब्रमण्या कुसनूर, आयआयटी बाँबेचे जल अभ्यासक डॉ. अविनाश कदम, आर्थिक विषयाचे अभ्यासक उदय नायर यावेळी उपस्थित होते अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवर दिली आहे.

जागावाटपावरून एकनाथ शिंदे नाराज; CM फडणवीसांनी घेतला मोठा निर्णय, दोन नेत्यांवर महत्वाची जबाबदारी –

follow us