बेलापूरमध्ये चार मजली इमारत कोसळली; सलून चालकाला जाग आल्याने शेकडोजणांचे वाचले प्राण

बेलापूरमध्ये चार मजली इमारत कोसळली; सलून चालकाला जाग आल्याने शेकडोजणांचे वाचले प्राण

Belapur Building Collapsed : लापूरमधील फणस पाडा परिसरात आज पहाटे 5 वाजण्याच्या 4 मजली इमारत (Building) कोसळली. यामध्ये अनेकजण दबल्याची भीती आहे. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशामक दलाची जवान दाखल झाले असून बचाव कार्याला सुरूवात झाली आहे. दरम्यान, ही दुर्घटना घडण्याआठी काही लोकांनी इमारतीतल रहिवाशांना सावध करत बाहेर काढल्याने मोठी जीवितहानी टळली असली तरी कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अजूनही काही लोक अडकल्याची भीती आहे.

तुम्हाला तडीपार केलं होतं अन् तुम्ही … शरद पवारांचे अमित शहांना प्रत्युत्तर

दरम्यान ही दुर्घटना सीबीडी बेलापूर परिसरातील शहाबाज गावात घडली. या 4 मजली रहिवासी इमारतीत तळमजल्यावर एक सलून आहे. शनिवारी पहाटे ५ च्या सुमारास सलूनचालकाला अचानक इमारत हलत असल्याचे जाणवल्यानंतर त्याने आरडाओरड सुरू केली. त्यानंतर परिसरातील नागरिक तेथे गोळा झाले आणि त्यांनी इमारतीतील सर्व मजल्यांवरील रहिवाशांना तातडीने बाहेर काढलं. त्याच्या या प्रसंगावधानामुळे अेकजणांचे प्राण वाचले आहेत. दरम्यान, इमारत कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube