देशभरात उष्णतेची लाट; महाराष्ट्रात वादळवाऱ्यासह पावसाची शक्यता; वाचा, काय आहे अंदाज

देशभरात उष्णतेची लाट; महाराष्ट्रात वादळवाऱ्यासह पावसाची शक्यता; वाचा, काय आहे अंदाज

Maharashtra Weather Today : देशभरातच उष्णतेची लाट निर्माण झाली असून दिल्ली-एनसीआरच्या हवामानात अचानक बदल झालेत. या भागात जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. (Weather) पावसामुळे दिल्लीकरांना उष्णतेपासून दिलासा मिळत असल्याचं दिसून येत आहे.

Arun Jagtap : नगरकरांचे काका हरपले! माजी आमदार अरुण जगताप यांचे निधन

हवामान खात्याने पुढील 2 तासांत दिल्ली-एनसीआर, यमुनानगर, कर्नाल, सफिदोन, पानीपत, सोहाना, पलवल, नूह, औरंगाबाद, होडल (हरियाणा), गंगोह, शामली, कांधला, नांदगाव, बरसाणा, राया, हाथरस, मथुरा, सादाबाद, आग्रा, जाजाऊ (उत्तर प्रदेश), भिवाडी, डीग, भरतपूर (राजस्थान) येथे अनेक ठिकाणी 40-90 किमी/ताशी जोरदार वाऱ्यांसह मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

1 मे च्या रात्रीपासून हवामान बदलण्यास सुरुवात होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. 2 मे ते 4 मे दरम्यान जोरदार वाऱ्यांसह हलका पाऊस पडेल. पुढील दोन दिवसांतही सतत पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या काळात जोरदार वारे वाहतील. काही ठिकाणी वादळ आणि गडगडाटाचा सामना करावा लागू शकतो, असं हवामान विभागाने सांगितले आहे.

महाराष्ट्रतही पाऊस बरसणार?

सध्या राजस्थानच्या पूर्व भागावर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे, त्यापासून केरळपर्यंत जाणारी हवेच्या कमी दाबाची रेषा निर्माण झाली आहे. ही रेषा विदर्भातून जाते. त्यामुळे बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे मोठ्या प्रमाणावर राज्याच्या दिशेने येत आहेत.

त्याचबरोबर स्थानिक पातळीवरील तापमान वाढीमुळे उंच ढगांची निर्मिती होऊन, पुढील चार दिवस मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह राज्यभरात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भातील बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांत पावसाचा जोर जास्त राहण्याचा अंदाज आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या