ताज हॉटेलसह विमानतळ बॉम्बने उडवू देणार, फोनवरून मुंबई पोलिसांना धमकी

ताज हॉटेलसह विमानतळ बॉम्बने उडवू देणार, फोनवरून मुंबई पोलिसांना धमकी

Threat To Bomb Taj Hotel and Mumbai Airport : एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईतील (Taj Hotel ) ताज हॉटेल आणि छ. शिवाजी महाराज विमानतळ बॉम्बने उडवू अशी धमकी आली आहे. ही धमकी मुंबई पोलिसांना देण्यात आली आहे. सायंकाळी उशिरा मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोनद्वारे ही धमकी देण्यात आली. (Threat) या धमकीनंतर पोलीस प्रशासन सतर्क झालं आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत ताज हॉटेल आणि विमानतळाची (Mumbai Airport) पाहणी केली. मात्र, कुठलीही संशयास्पद वस्तू किंवा इतर काही आढळलं नसल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

 

Summertime : उन्हाळ्यात फिरायला जाताय तर ‘या’ ठिकाणील हॉटेलला भेट द्या

तपासासा काही आढळलं नाही

मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला बॉम्बस्फोटाची धमकी देणारा फोन आला. धमकी देणार हा फोन कॉल उत्तर प्रदेशातून आला असल्याचं प्राथमिक तपासातून निष्पन्न झालं आहे. हा कॉल करणाऱ्या व्यक्तीने मुंबईतील ताज हॉटेल आणि मुंबई विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचं सांगितलं. मात्र, तपासादरम्यान त्या ठिकाणी काहीही आढळलं नाही. याप्रकरणाचा पुढील तपास मुंबई पोलिसांकडून सुरू आहे.

Salman Khan Threat: सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून सुरक्षेत वाढ

अनेकदा आले फोन

असे अनेकदा फोन आले आहेत. असा धमकीचा फोन येण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात मुंबईत सहा ठिकाणी बॉम्ब ठेवले असल्याचा संदेश मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला प्राप्त झाला होता. तत्पूर्वी गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यातही अशाच प्रचार एका फोनकॉल मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज