सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन गोदावरी नदीत उडी मारली; डॉक्टर महिलेने का उचललं टोकाचं पाऊल?

सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन गोदावरी नदीत उडी मारली; डॉक्टर महिलेने का उचललं टोकाचं पाऊल?

Chhatrapati Sambhajinagar : सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन एका महिलेनं गोदावरी नदीत उडी मारत आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही आई डॉक्टर (Sambhajinagar) असून तब्बल दोन तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर केवळ आईचाच मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. सहा महिन्याच्या चिमूकलीचा शोध सुरु आहे. या घटनेनं संपूर्ण शहर हळहळले आहे.

सहा महिन्याचा छोटा मुलगा

छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये महिला डॉक्टरनं सहा महिन्यांच्या बाळासह उडी मारून आत्महत्या केली असून नक्की या महिलेनं उडी का मारली याचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही. दरम्यान, पैठणच्या पाटेगावच्या पुलावरून गोदावरी नदीपात्रात महिलेनं सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन उडी टाकली. डॉक्टर पूजा प्रभाकर व्हरकटे असं आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. ३० वर्षे वय असणाऱ्या या महिलेला दोन मुले असून, सहा वर्षाचा मोठा मुलगा असून सहा महिन्याचा छोटा मुलगा आहे अशी माहिती मिळाली आहे.

तुमच्या मुलीचं लग्न झालं, मग इतर मुलींना संन्यासी बनण्याचं ज्ञान का?, जग्गी वासुदेवांना न्यायालयाचा सवाल

मला चांगतपुरीला जायचं आहे असं म्हणत ही डॉक्टर महिला मंगळवारी रिक्षास्टँडवर येत रिक्षात बसली. पावणे सातच्या सुमारास पाटेगाव पुलावर रिक्षा आल्यावर पाणी बघायच्या निमित्तानं ती रिक्षातून उतरली. रिक्षातून खाली उतरताच गोदावरी पात्रात या महिलेनं बाळासह उडी मारली. रिक्षावाल्यानं आरडाओरडा करताच मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झाले. पैठण पोलिसांना खबर कळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. याबाबत अधिकचा तपास सुरु आहे.

मच्छीमार गोदावरी पात्रात उतरले

या महिलेनं बाळासहीत गोदावरी पात्रात उडी मारल्याचं कळताच स्थानिक मच्छीमारांनी गोदावरी नदीत उतरत तब्बल दोन तास महिला व बाळाचा शोध घेतला. या रेस्क्यू ऑपरेशननंतर मृत महिलेला बाहेर काढण्यात आलं पण बाळाचा शोध लागला नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या