बेताल वक्तव्य करणाऱ्यांना जेलमध्ये टाका, औरंगजेबाची कबर काढल्याने इतिहास… आठवले काय म्हणाले?

बेताल वक्तव्य करणाऱ्यांना जेलमध्ये टाका, औरंगजेबाची कबर काढल्याने इतिहास… आठवले काय म्हणाले?

Ramdas Athawale : प्रशांत कोरटकर व राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य केलं. यांच्यावर गंभीर कलमे लावून त्यांना जेलमध्ये टाका, अशी मागणी (Ramdas Athawale) केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केली. राष्ट्रपुरुषांबद्दल बेताल वक्तव्ये करणारांना लगाम घालण्यासाठी कडक कायदा करण्याच्या खासदार उदयनराजे भोसले यांच्या मागणीचाही त्यांनी पुनरुच्चार केला.

औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण तापलं! सुप्रिया सुळे म्हणाल्या, प्रत्येकाची आस्था…

‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल प्रशांत कोरटकर व राहुल सोलापूरकरांनी केलेले वक्तव्य चीड आणणारे आहे. नेत्यांच्या सहवासातील लोकांचे असे बोलणे राज्याच्या संस्कृतीला शोभणारे नाही. या प्रकरणात सरकारने वेळीच कारवाई करायला पाहिजे होती.’ अजूनही ही बाब गांभीर्याने घेऊन कोरटकर व सोलापूरकरला जेलमध्ये टाकावे, तसेच भविष्यात कोणत्याच राष्ट्रपुरुषांबद्दल बोलताना विचारपूर्वक बोलले जावे, यासाठी कडक कायदा करण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा सर्व जातीधर्माच्या लोकांचा पक्ष असून, आगामी काळात आम्ही पक्षवाढीसाठी नऊ एप्रिलला लोणावळा येथील हिरकणी रिसॉर्टवर एक हजार कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर राज्याचे अधिवेशन घेणार असल्याचेही ते म्हणाले. बौद्धगयाप्रकरणी मुख्यमंत्री व राज्यपालांना भेटणार असल्याचेही ते म्हणाले. छावा चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर औरंगजेब कबरीचा मुद्दा पुढे येत आहे. कबरी काढून इतिहास पुसला जाणार नाही. सरकारने कायदा व सुव्यवस्था राहावी, अशा पद्धतीने निर्णय घेण्याची गरज आहे, तसंच, साखरवाडी येथे बुद्धविहारासाठी जागा द्यावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणार असल्याचेही मंत्री आठवले म्हणाले.

राणेंनी जपून बोलावे

माजी मंत्री नारायण राणे हे आमचे जवळचे मित्र आहेत. त्यांचे पुत्र नितेश राणे यांनी आपण मंत्रिपदावर आहोत, याचे भान ठेवून बोलण्याची गरज आहे. जातीजातीत संघर्ष निर्माण होईल, अशी वक्तव्ये त्यांनी टाळावीत. मुस्लिम समाजातील लोकांना वेठीस धरू नये. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात अनेक मुस्लिम कार्यरत होते. त्यामुळे राणे यांनी थोडं भान ठेवून बोलण्याची गरज असून, त्यांच्या भूमिकेचे कधीच समर्थन करणार नाही, असेही मंत्री आठवले म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube