दुष्काळामुळे जिल्हा बँक बिनविरोधसाठी प्रयत्न मात्र त्यातही राजकारण… विखेंची खंत

ADCC Bank election बिनविरोध व्हावी यावर आता भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी महत्त्वाचे भाष्य केले आहे.

Sujay Vikhe

ADCC Bank uncontested election due to the drought but politics played a role… Sujay Vikhe expressed disappointment : अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असून अर्ज दाखल झाल्यानंतर नुकतेच तीन जागा या बिनविरोध झाल्या असून याच निवडणुकीवरती आता भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी महत्त्वाचे भाष्य केले आहे.

ॲड. अभय मराठे मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण, प्रॉपर्टीच्या वादातून आजोबांनीच झाडली नातवाच्या छातीत गोळी

नगर जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये छाननी अर्जामध्ये जे काही आक्षेप असतील खोट्या सह्यांचे प्रकार असतील हे प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे जेव्हा राज्यात दुष्काळ पडला राज्यातील सर्व मोठ्या नेत्यांनी आव्हान केलं की निवडणूक बिनविरोध व्हावे मात्र तरी देखील यामध्ये एवढे मोठे राजकारण होत आहे.

गृहकर्ज आणि व्याजदर महागणार! आरबीआयने 4 वर्षांत पहिल्यांदाच वाढवला रेपो रेट

मात्र मला विश्वास आहे की साईबाबांच्या आशीर्वादाने इतर जागा देखील बिनविरोध होतील अशी आमची अपेक्षा आहे तसेच पुढे बोलताना विखे म्हणाले की जेव्हा एखाद्या निवडणुकीमध्ये पाच ते सहा जागा या शेतकरी असतील किंवा सभासदांच्या आशीर्वादाने बिनविरोध होतात यामुळे आपोआपच सर्वसामान्य मतदारांचा कौल किंवा ज्यांनी अर्ज भरला त्यांचाही कौल बिनविरोधच्या दिशेने जातो हे राजकारणामध्ये प्रथा राहिलेली आहे कार्यकर्त्यांचे प्रेम आणि कार्यकर्त्यांच्या आशीर्वाद हेच एखाद्या नेत्याला लाभतं हेच माझं भाग्य अशा शब्दात सुजय विखे यांनी शेतकरी सभासदांचे आभार मानले.

follow us