NCP On Field अधिवेशन संपले… दुसर्याच दिवशी राष्ट्रवादीचे नेते फिल्डवर!

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसची सर्वसामान्य शेतकऱ्यांसोबत… सर्वसामान्य कार्यकर्त्यांसोबत… जनतेसोबत बांधिलकी असल्यानेच राष्ट्रवादीचे नेते अधिवेशन संपल्याच्या दुसर्या दिवशीच फिल्डवर पोचले याचा अर्थ राष्ट्रवादी महाराष्ट्रातील जनतेसोबत आहे, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
शनिवारी विधीमंडळाचे कामकाज संपले आणि दुसर्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे चार दिवसांच्या उत्तर महाराष्ट्राच्या तर विरोधी पक्षनेते अजित पवार हे मराठवाडा दौर्यावर जनतेच्या दारात समस्या ऐकून घेण्यासाठी दाखल झाले आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्वसामान्य लोकांच्या मांडलेल्या प्रश्नावर मंत्र्यांनी उत्तर देणे अपेक्षित होते. मात्र, उत्तर देताना मंत्रीच गैरहजर होते. हे चित्र विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाराष्ट्रासमोर आणले आहे, हेही महेश तपासे यांनी स्पष्ट केले.
पुणे बाजार समिती रणधुमाळी सुरू : अजितदादा विरुद्ध चंद्रकांतदादा ‘सामना’ रंगणार – Letsupp
छत्रपती संभाजी नगर येथे महाविकास आघाडीची २ एप्रिल २०२३ रोजी जाहीर सभा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी ती यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. चेंबूर येथे मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने बुधवार (दि. २९) रोजी सायंकाळी पाच वाजता होणार्या ‘युवा मंथन, वेध भविष्याचा’ या शिबिराला आदरणीय शरद पवारसाहेब उपस्थित राहणार आहेत. मुंबई युवक अध्यक्ष निलेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या कार्यक्रमात आगामी मुंबई मनपा निवडणुकीबाबत पवार हे मार्गदर्शन करतील. युवकांचे प्रेरणास्थान असलेल्या शरद पवार यांना ऐकण्यासाठी हजारो युवक उपस्थित राहतील, असेही महेश तपासे यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांची खासदारकी रद्द केल्यानंतर आता त्यांच्या रद्द केलेल्या खासदारकीबाबत सुप्रीम कोर्टात उद्यापासून सुनावणी होणार आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचीही खासदारकी लोकसभा अध्यक्षांनी लोकप्रतिनिधींचा कायद्याचा आधार घेऊन रद्द केली आहे. मात्र, राज्यात शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांना अलिबाग कोर्टाने दोन वर्षांची सजा सुनावली असताना याच कायद्याचा आधार घेऊन त्यांची आमदारकी का रद्द करण्यात येत नाही, असा सवालही महेश तपासे यांनी उपस्थित केला आहे.