Video : चेकवर सही केली, लाडक्या बहिणींना पैसे कधी मिळणार? अजित पवारांनी सांगितली डेडलाईन

Video : चेकवर सही केली, लाडक्या बहिणींना पैसे कधी मिळणार? अजित पवारांनी सांगितली डेडलाईन

Ajit Pawar on Ladaki Bahin Yojana Update : राज्य सरकारच्या माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या या योजनेत लाभार्थ्यांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा केले जात आहेत. परंतु, निवडणूक काळात 2100 रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी आता हालचाली सुरू झाल्या आहेत. तर महिलांच्या खात्यात या महिन्याचा हप्ता कधी जमा होणार? याबाबत स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली ते जालन्यामध्ये बोलत होते.

आघाडीत होणार बिघाडी? उद्धव ठाकरेंना काँग्रेस देणार मोठा झटका, राजकीय वर्तुळात चर्चा

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, विरोधक म्हणतात की, ही योजना बंद होणार, ती योजना बंद होणार. अरे राज्य सरकार ठरवेल ना तुम्हाला कुणी अधिकार दिलाय. सरकारी योजनांच्या बाबत माहिती देण्याचा. तसेच पुढील आठ दिवसांत लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे येणार आहेत. मी चेकवर सही देखील केली आहे. असं म्हणत अजित दादांनी लाडक्या बहिणींच्या खात्यात या महिन्याचा हप्ता कधी जमा होणार? याबाबत मोठी माहिती दिली.

बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी! नगर जिल्ह्यात हजारो नोकऱ्या उपलब्ध होणार, ‘ही’ कंपनी करणार 500 कोटींची गुंतवणूक

त्याचबरोबर यावेळी त्यांनी पिकविमा योजनेचा गैरवापर करणाऱ्या लोकांना फटकारलं आहे. त्यावर ते म्हणाले की, काहींनी देवस्थानाची जमीन दाखवून पीकविमा भरला आहे. अरे हे पाप कुठे फेडाल ? असा सवाल अजित पवारांनी केला आहे. दुसऱ्यांनीच या योजनेचा फायदा घेणं चुकीचं असल्याचंही ते यावेळी म्हणाले आहेत. दरम्यान आज जालन्यामध्ये परतूरचे माजी आमदार सुरेश कुमार जेथलिया यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube