लाखांचे मताधिक्य घेत अक्षय कर्डिले विजयी…शरद पवारांच्या शिलेदाराचे पानिपत

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी एक लाखाहून अधिकच लिड घेऊन विजय मिळवत राजकीय वर्चस्व प्रस्थापित केले.

Untitled Design 77

Akshay Kardile wins : राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधनानंतर ही पोट निवडणूक लागली होती या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी एक लाखाहून अधिकच लिड घेऊन विजय मिळवत राजकीय वर्चस्व प्रस्थापित केले. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच आघाडी घेतलेल्या कर्डिले यांनी एकही टप्प्यावर मागे वळून पाहिले नाही. प्रत्येक फेरीत वाढत गेलेली आघाडी पाहता निकालाची औपचारिक घोषणा होण्यापूर्वीच त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. अखेरीस मोठ्या फरकाने त्यांनी ही निवडणूक जिंकत राहुरीतील राजकारणात भाजपचा झेंडा पुन्हा फडकवला.

तनपुरेंची माघार; निवडणुकीचा निर्णायक टर्निंग पॉइंट

या निवडणुकीतील सर्वात मोठा राजकीय ट्विस्ट म्हणजे प्राजक्ता तनपुरे यांनी घेतलेला माघारीचा निर्णय. सुरुवातीला तनपुरे निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र अचानक भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट तनपुरे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी निवडणूक न लढवायचे निर्णय घेतला राहुरीच्या विकासासाठी त्यांनी ही निवडणूक लढवली नाही या भेटीनंतर राजकीय समीकरणे झपाट्याने बदलली.या चर्चेनंतर तनपुरे यांनी राहुरीच्या विकासासाठी एक पाऊल मागे घेत आहे असे सांगत निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांच्या या माघारीमुळे महाविकास आघाडीची ताकद कमी झाली आणि निवडणुकीचा कल मोठ्या प्रमाणात भाजपकडे झुकला.

राष्ट्रवादी शरद पवार गटकडून शेवटच्या क्षणी मोकाटेंना उमेदवारी

तनपुरे यांच्या माघारीनंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमोर उमेदवाराचा प्रश्न निर्माण झाला. शेवटच्या क्षणी पंचायत समितीचे माजी सदस्य गोविंद मोकाटे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र अचानक मिळालेल्या संधीमुळे त्यांना प्रभावी प्रचार उभारता आला नाही आणि त्याचा परिणाम थेट निकालावर दिसून आला. त्यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झालेला आपल्याला दिसून आला आहे

तिरंगी लढतीत भाजपचा एकतर्फी विजय

या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात तिरंगी लढत झाली. वंचितचे उमेदवार संतोष चोळके यांनीही जोरदार प्रचार केला, तर राष्ट्रवादीकडून गोविंद मोकाटे आणि अपक्ष रावसाहेब खेवरे हे रिंगणात होते. याशिवाय काही अपक्ष उमेदवारांनीही लढत दिली.
सुरुवातीला ३० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. छाननीनंतर २३ अर्ज वैध ठरले, मात्र माघारीच्या प्रक्रियेनंतर अखेरीस ७ उमेदवार मैदानात राहिले. या सर्वांमध्ये कर्डिले यांनी स्पष्ट आघाडी घेत एकतर्फी विजय मिळवला.

वंचितकडून टीकेची झोड; डमी उमेदवारचा आरोप

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी निवडणुकीदरम्यान सत्ताधाऱ्यांवर आणि राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला. ही लढत वंचित आणि भाजप यांच्यातच आहे, राष्ट्रवादीचा उमेदवार हा केवळ डमी आहे,असा थेट आरोप त्यांनी केला. तसेच घराणेशाही, ईडी कारवाई आणि विविध प्रकरणांवरून त्यांनी विरोधकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

विखे-जगताप यांची रणनीती ठरली यशस्वी

अक्षय कर्डिले यांच्या विजयामागे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नेतृत्व, स्थानिक नेत्यांची मजबूत संघटना आणि प्रभावी निवडणूक व्यवस्थापन हे महत्त्वाचे घटक ठरले. तसेच स्थानिक पातळीवर विखे गट आणि इतर नेत्यांनी केलेले नियोजनबद्ध प्रयत्नही निर्णायक ठरले.गावागावात संपर्क मोहीम, कार्यकर्त्यांची एकजूट आणि मतदानाच्या दिवशीचे व्यवस्थापन यामुळे भाजपला मोठा फायदा झाला. यामुळेच कर्डिले यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मोठी आघाडी घेत विजय मिळवला.

बिनविरोधच्या चर्चांना पूर्णविराम; थेट लढतीत भाजपचा विजय

निवडणूक बिनविरोध होण्याच्या चर्चांना सुरुवातीला जोर होता. मात्र तनपुरेंच्या माघारीनंतरही निवडणूक रंगली आणि अखेर थेट लढतीत भाजपने बाजी मारली. या निकालामुळे राहुरीतील राजकीय समीकरणे बदलली असून भाजपने आपली ताकद पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.एकंदरीत, तनपुरे यांच्या माघारीपासून ते शेवटच्या क्षणापर्यंत घडलेल्या राजकीय घडामोडींनी राहुरी पोटनिवडणूक अत्यंत नाट्यमय बनवली. मात्र शेवटी संघटनशक्ती, रणनीती आणि नेतृत्वाच्या जोरावर अक्षय कर्डिले यांनी दणदणीत विजय मिळवत भाजपचा झेंडा उंचावला.

कोणाला किती मत पडली ?

अक्षय कर्डिले – 140093

गोविंद मोकाटे – 27506

संतोष चोळके 5690

रावसाहेब खेवरे – 7299

अथर्व म्हसे- 1148

सूर्यभान लांबे – 1368

महेश हापसे – 2051

नोटा- 1632

follow us