धक्कादायक : बीड जिल्ह्यात गर्भपिशव्या काढण्याचे प्रकार; सर्वाधिक शस्त्रक्रिया खासगी रूग्णालयात
Illegal Amniotic sac operation In Maharashtra Beed District : बीड जिल्ह्यातील डॉ. सुदाम मुंडे प्रकरणाने राज्यातील आरोग्य व्यवस्थेचे लख्तरं बाहेर काढली होती. अवैध पद्धतीने गर्भपात करण्याचा प्रकार डॉ. मुंडे यांच्याकडून केला जात होता. त्यानंतर आरोग्य विभागातील अधिकाऱ्याच्या कामावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा बीड जिल्ह्यात गर्भपिशव्या (Amniotic sac ) काढण्याच्या प्रकारांनी डोके वर काढले आहे. गेल्या पाच वर्षात बीड जिल्ह्यात चार हजार 714 शस्त्रक्रियांच्या माध्यमातून महिलांच्या गर्भपिशव्या काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे, असे वृत्त लोकमतने दिले आहे.
‘आता श्रीरामांच्या उमेदवारीची घोषणाच बाकी’; भाजपाच्या राजकारणावर राऊतांचा प्रहार
यात सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे अवघ्या 23 वर्ष वय असणाऱ्या एका विवाहित मुलीचीदेखीळ शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या वाढत्या प्रकरणांमुळे राज्यात हे काय चाललंय? राज्याला आरोग्य सचिव नाहीत का? आरोग्य विभाग नाही का? असे एक न अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
आता 10 महिने बारामतीतच मुक्काम ठोकणार! सुप्रियाताईंनी घेतला दादांचा अन् भाजपचा धसका?
खासगी रूग्णालयात शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाण अधिक
गेल्या पाच वर्षात बीड जिल्ह्यात 4 हजार 714 महिलांच्या गर्भपिशव्या काढल्याचे समोर आले आहे. यातील निम्याहून अधिक म्हणजे अडीच हजार गर्भपिशव्या काढण्याच्या शस्त्रक्रिया या खासगी रूग्णालयात काढण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यात एका 23 वर्षीय विवाहित महिलेचाही समावेश आहे.
आकडेवारी नेमकी कशी?
2016 ते 2018 या तीन वर्षांच्या काळात शंभरहून अधिक खासगी रूग्णालयांत तब्बत चार हजार 604 महिलांच्या गर्भपिशव्या काढण्यात आल्या होत्या. तर, 2019 मध्ये खासगी रूग्णालयात 551 सरकारी रूग्णालयात 459, 2020 खासगी रूग्णालयात 310, खासगी रूग्णालयात 235, 2021 मध्ये खासगी रूग्णालयात 559, सरकारी रूग्णालात 307 गर्भपिशव्या काढण्यात आल्या आहेत. याशिवाय 2022 मध्ये खासगी रूग्णालयात 681 तर सरकारी रूग्णालयात 696, तर, 2023 या वर्षात खासगी रूग्णालयात 495 आणि सरकारी रूग्णालयात 421 महिलांच्या गर्भपिशव्या काढून टाकण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाने वाढले प्रकार
मुंडे प्रकरणामुळे बीडसह राज्यातील आरोग्य यंत्रणा, अधिकारी सतर्क झाले होते. यामुळे अवैध पद्धतीने गर्भपातासह अन्य प्रकारणांवर काहीवर्ष आळा बसला होता. मात्र, अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे पुन्हा एकदा अवैध गर्भपात करण्याबरोबर गर्भपिशव्या काढण्याच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे चित्र समोर आले आहे.