मिटकरी ढसाढसा रडले… पण विधान परिषदेचे तिकीट न मिळताच पुन्हा लढण्याची भाषा

Amol Mitkari : विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून कुणाला संधी मिळणार याबाबत राज्यातील राजकीय

Amol Mitkari

Amol Mitkari : विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून कुणाला संधी मिळणार याबाबत राज्यातील राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले होते. आज 30 एप्रिल अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी मोठा निर्णय घेत माजी आमदार झिशान सिद्दीकीला (Zeeshan Siddique) राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करत अनेकांना धक्का दिला आहे. उमेदवारी जाहीर होताच झिशान सिद्दीकी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

तर दुसरीकडे झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांची सोशल मीडियावरील एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टच्या माध्यमांतून अमोल मिटकरी यांनी नाराजी व्यक्त केली असल्याची चर्चा सुरु आहे. अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी या पोस्टमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मृत्यूचा तपास लागेपर्यंत मी शांत बसणार नाही असं म्हटलं आहे. तसेच यासाठी जर यापेक्षा मोठी किंमत चुकावी लागली तर चालेल. जान भी देंगे असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

नेमकं काय म्हणाले अमोल मिटकरी ?

माझ्या लढाईचं हेच फळ मिळेल ही मानसिक तयारी 29 जानेवारीलाच केली होती दादा… हरकत नाही. …दादा तुमच्यासाठी ‘एक संधी’ काय अशा ‘हजार संधी’ हा अमोल मिटकरी ओवाळून टाकेल. तुमची लढाई कालही लढत होतो, आजही लढत आहे आणि उद्याही लढत राहील , या लढाईत कोणी सोबत असो अथवा नसो न्याय मिळेपर्यंत ही लढाई थांबवणार नाही तीच तुम्हाला खरी श्रद्धांजली ठरेल! अपघाताचं सत्य समोर येईपर्यंत मी शांत बसणार नाही,वेळ पडल्यास याहीपेक्षा मोठी किंमत चुकवेल जान भी देंगे.

भाजपकडून सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार आणि प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर शिवसेना शिंदे गटकडून नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांना उमेदवारी मिळाली आहे. तर अजित पवार गटाकडून झिशान सिद्दीकी आणि महाविकास आघाडीकडून अंबादास दानवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

UAE चा OPEC मधून बाहेर पडण्याचा निर्णय अन् भारतासाठी सुवर्णसंधी; जागतिक तेल बाजारात नेमकं घडणार काय?

follow us