एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा भाजपला दणका; सोलापुरमध्ये घेतला मोठा निर्णय
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती झाल्याची बातमी समोर आली आहे.
महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची तारीख दोनच दिवसांवर आली आहे. (Election) त्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय चांगलच तापलं आहे. कुणाची युती फिसकटली तर कुणाची युती फिसकटली असं वातावरण आहे. युतीमध्ये भाजपाला बाहेर ठेवले जात आहे. तर काही ठिकाणी शिंदे गट आणि अजित पवार यांना बाहेर ठेवून युती जन्माला येत आहे. सोलापूर जिल्ह्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होते तिथ शिंदे शिवसेनेने भाजपला दणका दिला आहे.
सोलापुरमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपा यांच्यात युती करण्यासाठी चर्चा चालू होती. परंतु आता ऐनवेळी येथे मोठा ट्विस्ट आला आहे. सोलापुरात एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्ष आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी या दोन पक्षांनी युती केली असून भाजपाला धक्का दिला आहे. या नव्या प्रयोगामुळे आता सोलापुरातील विजयाचं गणित बदलणार आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. सोलापूर महापालिकेसाठी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र आले आहेत. या दोन्ही पक्षांत 51-51 जागांचा फॉर्म्युला ठरला आहे, याबाबत शिंदे गटाचे नेते सिद्धराम म्हेत्रे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मोठी बातमी : मुंबईत काँग्रेस आणि वंचितची आघाडी, कोण किती जागांवर लढणार?
नगरविकास खातं आणि अर्थखातं आमच्या पक्षांच्या नेत्यांकडं आहे. त्यामुळे आम्हाला निधीची कमतरता पडणार नाही. शहर विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असं म्हेत्रे म्हणाले. आम्ही भाजपकडे 40 जागांची मागणी केली होती. त्यांनी आम्हाला ८ जागा देण्यास कबूल केलं होतं. पण आम्ही 26 जागांवर ठाम होतो. त्यांनी पुढे चर्चा केली नाही, असं म्हणत म्हेत्रे यांनी अजित पवार यांच्यासोबत युती केल्याचं म्हेत्रे यांनी जाहीर केलं. या युतीसाठी राष्ट्रवादीचे संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते सिद्धाराम म्हेत्रे यांच्यात चर्चा चालू होती.
सोलापूर महापालिकेसाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये युतीची बोलणी पुढे सरकत नसल्याने शिंदे गट अस्वस्थ होता. भाजपा आणि शिवसेनेची युती होत असल्याने अजित पवार गटाने स्वबळावर लढण्याचा नारा दिला होता. मात्र, काल (27 डिसेंबर) कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या दौऱ्यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युतीच्या हालचालींना वेग आला आणि युती निश्चित झाली. दरम्यान, आता सोलापुरात कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
