मोठी बातमी! विधान परिषदेच्या 4 जागांसाठी निवडणुकांची घोषणा, ‘या’ दिवशी होणार मतदान

मोठी बातमी! विधान परिषदेच्या 4 जागांसाठी निवडणुकांची घोषणा, ‘या’ दिवशी होणार मतदान

Vidhan Parishad Election 2024: नुकतंच राज्यात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) रणधुमाळी संपली आहे. तर आता महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 4 जागांसाठी (Vidhan Parishad Election 2024) निवडणूका जाहीर करण्यात आले आहे.

जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार 26 जून रोजी मुंबई, कोकण पदवीधर आणि मुंबई, नाशिक शिक्षक मतदारसंघात निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 1 जुलै रोजी मतमोजणी केली जाणार आहे.

निवडणूक आयोगाकडून (Election Commission) काही दिवसापूर्वी विधानपरिषदेच्या 4 जागांसाठी निवडणूका जाहीर करण्यात आले होते मात्र सुरु असणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या ड्युटीवर शिक्षक असल्याने या निवडणुका पुढे ढकलण्यात आले होते. तर आता पुन्हा एकदा या निवडणुकीच्या घोषणा करण्यात आले आहे.

यापूर्वी निवडणूक आयोगाकडून विधान परिषदेच्या 4 जागांसाठी 10 जून रोजी निवडणूक होणार असल्याचे जाहीर केले होते मात्र राज्यात अनेक शिक्षक लोकसभा निवडणुकीच्या ड्युटीवर असल्याने ही निवडणूक शाळा सुरु झाल्यानंतर घेण्यात यावी अशी मागणी अनेकांनी निवडणूक आयोगाकडे केली होती.

यानुसार आता मुंबई, कोकण पदवीधर आणि मुंबई, नाशिक शिक्षक मतदारसंघात 26 जून रोजी मतदान पार पडणार असून 1 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.

1971 मध्ये ‘मी’ असतो तर कर्तारपूर भारतात असते, मोदींचा काँग्रेसवर घणाघात

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम

31 मे ते 7 जून पर्यंत उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे. तर निवडणूक अधिकाऱ्यांकडून 10 जून रोजी अर्जाची छाननी केली जाणार आहे. उमेदवाराला 12 जूनपर्यंत अर्ज अर्ज माघार घेता येणार आहे. 26 जून रोजी चारही मतदारसंघात मतदान होणार असून 1 जुलै रोजी होणार मतमोजणी होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज