1971 मध्ये ‘मी’ असतो तर कर्तारपूर भारतात असते, मोदींचा काँग्रेसवर घणाघात

1971 मध्ये ‘मी’ असतो तर कर्तारपूर भारतात असते, मोदींचा काँग्रेसवर घणाघात

PM Modi Patiala Rally: देशात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election) वारे वाहत असून महाराष्ट्रात 15 पेक्षा जास्त सभा घेत विरोधकांवर हल्लाबोल करणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) आज पटियाला (Patiala) येथे भाजपच्या (BJP) उमेदवारासाठी जाहीर सभा घेतली आहे. या जाहीर सभेत बोलताना त्यांनी काँग्रेससह (Congress) आम आदमी पक्षावर (AAP) निशाणा साधला तसेच 1971 मध्ये मी देशाचा पंतप्रधान असतो तर आज कर्तारपूर भारतात असते असं देखील मोदी म्हणाले.

या सभेत बोलताना मोदी म्हणाले, काँग्रेसने फक्त सत्तेसाठी देशाची फाळणी केली आणि यामुळे आपल्याला आज दुर्बिणीतून करतारपूर साहिबचे (Kartarpur Sahib) दर्शन करावे लागत आहेत. जेव्हा बांगलादेश युद्ध झाले तेव्हा 90 हजारांहून अधिक पाकिस्तानी सैनिकांनी आत्मसमर्पण केले होते. आपल्याकडे 90 हजारांहून अधिक सैनिक ताब्यात होते. मी तुम्हाला सांगतो जर तेव्हा मी असतो तर त्यांच्याकडून करतारपूर साहिब घेतला असता आणि त्यानंतर सैनिकांना सोडले असते त्यांना (काँग्रेस) हे जमले नाही. मात्र माझ्याकडून जितकी होईल तितकी मी सेवा केली आहे आज कर्तारपूर साहिब तुमच्या समोर आहे असं मोदी म्हणाले.

पुढे बोलताना मोदी म्हणाले, आमच्या सरकारने लंगरला करातून सूट दिली, मागच्या सरकारमध्ये परदेशातील भाविकांना श्री हरमंदिर साहिबमध्ये देणगी देता येत नव्हती मात्र आमच्या सरकारने त्यासाठी नियम बदलले. तसेच साहिबजादांच्या शौर्याला समर्पित वीर बाल दिवस घोषित करण्याचा काम आमच्या सरकारने केले असं देखील यावेळी मोदी म्हणाले.

तर इंडिया आघाडीवर टीका करताना मोदी म्हणाले, इंडिया आघाडी जातीयवाद आणि कुटुंबावादी आहे. हे लोक सत्तेसाठी कोणाचाही विश्वासघात करू शकतात. एकीकडे दहशतवाद्यांना घरात घुसून मारणारे आम्ही आहोत तर दुसरीकडे दहशतवाद्यांच्या चकमकीवर अश्रू ढाळणारे इंडिया आघाडीचे लोक आहे.

कल्याणमध्ये ठाकरे पालटणार बाजी की शिंदे राखणार गड, बालेकिल्यात कोणाला मिळणार विजय?

दिल्लीतील कट्टर भ्रष्ट पक्ष आणि शीख दंगलीतील दोषी पक्ष फक्त पंजाबमध्ये दाखवण्यासाठी समोरासमोर लढण्याचे नाटक करत आहे मात्र दोन्ही पक्ष एकच आहे असं म्हणत मोदींनी काँग्रेस आणि आम आदमी पक्षावर निशाणा साधला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज