संसारातील अडचणी दूर व्हाव्यात म्हणून जोडपं खरातकडं गेलं आणि नको ते होऊन बसलं, आणखी एक गुन्हा दाखल

अशोक खरात याने महिलेच्या पतीला केबिनबाहेर थांबायला सांगितले आणि महिलेला आत बोलावून तिला पाणी पाजून अत्याचार केला.

  • Written By: Published:
Untitled Design (38)

Another case registered against Ashok Kharat : नाशिकमध्ये भोंदू बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात याच्याविरोधात गंभीर गुन्हे दाखल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा त्याच्याविरोधात दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले असून, त्यामध्ये लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीचा समावेश आहे. लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात, संबंधित महिलेची तक्रार अत्यंत धक्कादायक आहे. महिलेने दिलेल्या माहितीनुसार, अशोक खरात याने स्वतःला दैवी अवतार असल्याचे भासवून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तांब्याच्या भांड्यातील पाणी पाजून तिला गुन्हवून तिच्या अत्याचार केल्याचा आरोप आहे.

एवढेच नव्हे, तर मी महादेवाचा अवतार आहे, माझ्याकडे दैवी शक्ती आहे, जर तू ही गोष्ट कोणाला सांगितली तर तुझ्या कुटुंबाचा नाश कारेन, अशी धमकी देखील त्याने दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. ही पीडित महिला आणि तिचा पती वैवाहिक आयुष्यातील समस्यांमुळे त्रस्त होते, मात्र मतभेदांमुळे ते एकत्र राहत नव्हते. एका ओळखींच्य व्यक्तीच्या सल्ल्यानुसार त्यांनी 2022 साली पहिल्यांदा अशोक खरात याची भेट घेतली. त्याने त्यांच्या लग्नाची तारीख चुकीची असल्याचे सांगत त्यांच्या अडचणीचे कारण दिले आणि त्यांना वारंवार भेटायला भाग पाडले.

ऑगस्ट 2024 मध्ये कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयात भेटीदरम्यान, अशोक खरात याने पतीला केबिनबाहेर थांबायला सांगितले आणि महिलेला आत बोलावून तिला पाणी पाजून अत्याचार केला. ऑगस्ट ते डिसेंबर 2024 या काळात अशाच प्रकारे चार वेळा जबरदस्तीने गैरकृत्य केल्याची फिर्याद महिलेने सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

गुप्त ऑपरेशनचा थरार! रात्रीच्या अंधारात आखलेल्या ऑपरेशनमध्ये भोंदू बाबा खरातला पोलिसांनी कसा गाठलं?

विशेष म्हणजे, अशोक खरात याच्याविरोधात यापूर्वी देखील अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. आतापर्यंत त्याच्यावर एकूण 10 गुन्हे नोंदवले गेले असून, त्यात 8 महिला अत्याचाराचे आणि 2 आर्थिक फसवणुकीचे गुन्हे आहेत. आर्थिक फसवणुकीसंदर्भात राजेंद्र जासूद आणि राजेंद्र भागवत यांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. दरम्यान, या प्रकरणात आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. पीडित महिलांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली आहे.

सायबर पोलिसांनी नव्याने 65 जणांविरोधात गुन्हे दाखल केले असून, आतापर्यंत एकूण 74 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. फेसबुक आणि इंस्टाग्रामवरील अनेक प्रोफाईलधारकांवर गुन्हे नोंदवले गेले आहेत. नाशिक पोलिसांनी नागरिकांना स्पष्ट इशारा दिला आहे की, अशा संवेदनशील प्रकरणांतील फोटो किंवा व्हिडिओ शेअर करणे हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे कोणी देखील अशा प्रकारचे कृत्य करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे नाशिकमध्ये संतापाची लाट उसळली असून, भोंदूबाबांच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांवर पुन्हा एकदा प्रशचिन्ह उपस्थित झाले आहे.

 

follow us