Rupali Chakankar : अशोक खरात प्रकरण, रुपाली चाकणकर आज SIT समोर हजर होणार

Rupali Chakankar : नाशिक भोंदूबाब अशोक खरात प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे होत असल्याने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

Rupali Chakankar

Rupali Chakankar : नाशिक भोंदूबाब अशोक खरात प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे होत असल्याने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे आज (10 मे) या प्रकरणात मोठी घडामोड घडताना दिसत आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर आज नाशिकमध्ये एसआयटीसमोर हजर राहणार आहे. एसआयटीसमोर हजर राहण्यासाठी रुपाली चाकणकर पुण्याहून नाशिककडे रवाना झाल्या असून सकाळी 10.30 च्या आसापास एसआयटीच्या कार्यालयात दाखल होण्याची शक्यता आहे.

अनेक महिलांच्या लैंगिक शोषण केल्या प्रकरणात भोंदूबाबा अशोक खरातवर (Ashok Kharat) गुन्हा दाखल करण्यात आला असून या अशोक खरातशी रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांचे निकटचे संबंध असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या प्रकरणात अशोक खरातसोबत रुपाली चाकणकर यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विरोधकांकडून रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात येत होता. या प्रकरणात रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता.

रुपाली चाकणकर यांनी अशोक खरात यांना काही प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी राजकीय हस्तक्षेप केला असल्याचा आरोप देखील विरोधकांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणात रुपाली चाकणकर एसयाटीसमोर यापूर्वी देखील हजर राहणार होते मात्र त्यांची त्यावेळी तब्येत खराब असल्याने रुपाली चाकणकर एसआयटीसमोर हजर झाल्या नव्हत्या.

मुंबई, कोकणासह ‘या’ भागात आज उष्णेतेची लाट; यलो अलर्ट जारी

तर आज रुपाली चाकणकर एसआयटी समोर हजर होणार असल्याने या प्रकरणात आणखी काही धक्कादायक खुलासे होणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

तामिळनाडूमध्ये ‘TVK’ सरकार; आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार सी जोसेफ विजय-

follow us