लोणावळ्यात पर्यटकांना खोट्या गुन्ह्याची धमकी देत 5 लाखांच्या खंडणीचा प्रयत्न; तीन पोलिसांसह 6 जणांविरोधात गुन्हा

extort tourists in Lonavala लोणावळ्यात पर्यटकांना 5 लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणात तीन पोलिसांसह 6 जणांविरोधात गुन्हा

Extort Tourists In Lonavala

Attempt to extort tourists in Lonavala case registered against six including three police : लोणावळ्यात फिरण्यासाठी निघालेल्या पर्यटकांना रस्त्यात अडवून, गाडीत ड्रग्ज असल्याचा बहाणा करत 5 लाख रुपयांची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांनी दिली होती. त्यानंतर आता या प्रकरणात तीन पोलिसांसह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

भारतातील सर्वात मोठा नाट्यमहोत्सव ‘द ड्रामा उत्सव मुंबई 2026’ जाहीर; दिग्गज कलाकारांचा होणार सहभाग

पुण्यातील विमाननगर येथील तक्रारदार भूषित उमेश शर्मा हे त्यांच्या मित्रांसह 5 जुलै रोजी कारने लोणावळ्याकडे निघाले होते. वाटेत एका झायलो कारमधून आलेल्या 6 अज्ञात इसमांनी त्यांची गाडी अडवली. “आम्ही पोलीस आहोत,” अशी बतावणी करत त्यांनी गाडीची तपासणी सुरू केली. मित्राकडे सिगारेटचे पाकीट सापडल्यानंतर गाडीत गांजा व इतर अमली पदार्थ असल्याचा खोटा आरोप करत कारवाईची भीती दाखवून त्यांनी 5 लाख रुपयांची खंडणी मागितली.

‘मान्सून’ आला म्हणतो, पण या शब्दाचा उगम कुठे झाला?; असा आहे अरब ते महाराष्ट्र रंजक प्रवास

पैसे उकळण्यासाठी आरोपींनी पर्यटकांना तळेगाव येथील एटीएममध्ये नेले. मात्र, पर्यटकांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे लक्षात येताच, तोतया पोलीस तेथून पसार झाले. या प्रकरणी पोलिसांनी सुरूवातीला 6 अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता मात्र आता यामध्ये पोलिसांवर देखील गुन्हा दाखल झाला आहे.

E20 पेट्रोलमुळे नाही ‘या’ कारणाने गाडी बंद; युट्युबर मनीष कश्यप यांच्या आरोपांवर टोयोटाची पहिली प्रतिक्रिया

या प्रकरणात तीन महामार्ग पोलीस कर्मचारी आणि दोन ग्रामीण पोलीस होमगार्ड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनासाठी ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे प्रस्तावही पाठविण्यात आल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.

follow us