बाळासाहेब, वाजपेयींना जमलं नाही ते सावंत बंधूंनी करुन दाखवलं, सावंत बरळले…

  • Written By: Published:
Nanded Government Hospital Death

सोलापूर : आरोग्यमंत्री तानाजी सावंत काल सोलापूरमध्ये एका सभेत बोलत होते. त्यावेळी त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे ते म्हणाले आज आम्ही या सभेला 7 लाखांची गर्दी जमवली आहे जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीनां जे जमलं नाही ते सावंत बंधूनी करून दाखवलं. सावंत जरी मोठेपणाच्या ओघात बोलून केले असले तरी आता त्यांना स्वतःचा पक्षातील लोकांसहित, भाजप आणि उद्धव ठाकरें गटांच्या लोकांच्या रागाला सामोरे जावे लागणार आहे.

तानाजी सावंत जरी बोलण्याच्या ओघात बोलून गेले असले तरी आता असा प्रश्न निर्माण होतोय कि सावंत हे बाळासाहेब व वाजपेयी पेक्षा मोठे आहेत का? सावंतांनी असे बोलून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोष स्वतःहून ओढून घेतला आहे. अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे.

तानाजी सावंत यांचा डोळा विखे यांच्या पालकमंत्री पदावर 

तानाजी सावंत नेमकं काय म्हणाले…

“आपल्या सोलापूर जिल्ह्यासहित तमाम महाराष्ट्राच्या जनतेला माहित होत. सभेसाठी आपण जे पटांगण घेतलं होत ते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीनां भरला नाही तसेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना देखील भरलं नव्हतं, अडवाणींना देखील भरवता आलं नाही. या पंढरीच्या नगरीत 2018 साली सावंत बंधूनी 7 लाख लोकांचा मेळावा घेऊन ते पटांगण भरून दाखवलं होत.”

 

 

 

 

 

 

follow us