सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शिंदेंच्या शिवतारेंची उडी! 21 जागांसाठी 42 अर्ज दाखल…
Baramati Someshwar Cooperative Sugar Factory Elections आता या निवडणुकीमध्ये शिदेंच्या शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांनी एन्ट्री केली आहे.
Baramati Someshwar Cooperative Sugar Factory Elections Shivsena Vijay Shivtare entry after Yugendra Pawar : गेल्या 2 वर्षांपासून पुण्याच्या बारामतीतील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर सत्ता असलेले दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर या कारखान्याची पहिल्यांदाच निवडणूक होणार आहे. अगोदर ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता होती. पण अगोदर युगेंद्र पवारांच्या पॅनलनंतर ही लढत पवार विरूद्ध पवार अशी होणार असल्याची चर्चा होती आता मात्र ही निवडणूक चांगलीच रंगणार असल्याचं दिसत आहे. कारण आता या निवडणुकीमध्ये शिदेंच्या शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांनी एन्ट्री केली आहे.
IND vs AFG : वैभव सूर्यवंशीला संधी तर संजू बाहेर? दुसऱ्या टी20 साठी भारतीय संघात 3 बदल
सोमेश्वर कारखान्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सध्या सत्ता आहे. गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीत अजित पवारांनी हा कारखाना आता आपल्या ताब्यात ठेवला होता. आता सोमेश्वर साखर कारखान्यासाठी 11 ऑक्टोबरला मतदान होणार असून, 12 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. या कारखान्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) विरुद्ध शरद पवारांचा पॅनल असा संघर्ष होणार आहे.
दिशा सालियान प्रकरणात ठाकरे मुख्यमंत्री असताना… राज ठाकरेंची पोस्ट अन् भाजप नेत्याचा गंभीर आरोप
म्हणजेच दोन्ही राष्ट्रवादीमध्ये चुरस असणार आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार (Yugendra Pawar) व आमदार रोहित पवार यांनी निवडणूक लढविण्याची घोषणा करून राजकीय खळबळ उडून दिलीय. तर दुसरीकडे पुरंदरचे शिवसेना आमदार विजय शिवतारे यांनीही पॅनेल उभा करण्याचा निर्णय घेतलाय. तर भाजपचे नेते संजय जगताप यांनी पॅनेल देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या कारखान्यासाठी चौरंगी लढती होण्याची शक्यता आहे.
पवार विरुद्ध पवार लढतीत शिवतारेंची उडी…
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आम्ही बिनविरोध होऊ देणार नाही. असा इशारा शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आणि नेते विजय शिवतारे यांनी दिला आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीत एकूण 21 जागांसाठी शिवतारे यांनी तब्बल 42 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे आता एकीकडे पवार विरूद्ध पवार तसेच शिवसेना आमदार विजय शिवतारे आणि भाजपचे नेते संजय जगताप यांनी पॅनेल देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या कारखान्यासाठी चौरंगी लढती होण्याची शक्यता आहे.