Video : जिल्ह्याचा खासदार झालो पण ‘ती’ इच्छा अपूर्ण; खासदार सोनवणेंना काय व्हायचंय?

Beed MP Bajrang Sonawane Exclusive : बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे (MP) यांनी आता नव-नवे खुलासे केले आहेत. लेट्सअप मराठीचा खासदारांचे रिपोर्ट कार्ड या कार्यक्रमांतर्गत खासदारांचे रिपोर्ट कार्ड या कार्यक्रमात त्यांनी मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी अनेक विषयांवर दिलखुलास उत्तर दिली. त्यांनी यावेळी केज विधानसभेचा सदस्य होण्याबद्दलही भूमिका मांडली.
केज मतदारसंघ राखीव असल्याने मला आमदार होता आलं नाही असं म्हणत बजरंग सोनवणे यांनी बीड जिल्ह्याच खासदार पद मिळालं असलं तरी आपण आमदार झालेलो नाही याबद्दल वाटणारी खंत उघड बोलून दाखवली आहे. ते म्हणाले मी केज तालुक्यातील एकही पंचायत समिती गट नाही ज्यामधून निवडणुक लढलो नाही. कारण प्रत्येकवेळी राखीव असल्याने मला ते कराव लागलं असंही ते म्हणाले.
Video : अजित पवारांना ती गोष्ट माहिती होती; बीडच्या खासदारांचा मोठा गोप्यस्फोट
यावेळी बजरंग सोनवणे म्हणाले, मी फार कमी वयात राजकारणात आलो. त्यानंतर मला पुढ पुढ जाण्यात यश आलं. मात्र, केज तालुक्याचा आमदार आणखी झालेलो नाही. मतदारसंख राखीव नसता तर फार लवकर मी केजचा आमदार झालो असतो असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला. त्याचबरोबर आज खासदार असलो तरी भविष्यात संधी तशी भेटली तर मी नक्की आमदार होणार असंही ते म्हणाले आहेत.
केज मतदारसंघ हा 1978 पासून राखीव असून आत्तापर्यंत केज मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केलेले लोकप्रतिनिधी खालीलप्रमाणे.
1962 गोविंदराव गायकवाड
1967 सुंदरराव सोळंके
1972 बाबुराव आडसकर
1978 भागुजी निवृत्ती सातपुते
1980 गंगाधर निळकंठ स्वामी
1985 भागुजी निवृत्ती सातपुते
1990 विमलताई मुंदडा
1995 विमलताई मुंदडा
1999 विमलताई मुंदडा
2004 विमलताई मुंदडा
2009 विमलताई मुंदडा
2012 पृथ्वीराज साठे
2014 संगीता ठोंबरे
2019 नमिता मुंदडा
2024 नमिता मुंदडा