उद्धव ठाकरे यांना मोठा दिलासा; बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाचा नकार

उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी दाखल याच्यावर सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाचा नकार.

  • Written By: Published:
Untitled Design (142)

Big relief for Uddhav Thackeray : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackrey) आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बेहिशेबी मालमत्ता जमावल्याचा आरोप करण्यात आला होता. यासंदर्भात उच्च न्यायालयात(High Court) याचिका दाखल करण्यात आली होती. आता या याचिकेवर सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. यापूर्वी देखील अशाच प्रकारचे आरोप करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. ती देखील फेटाळण्यात आली होती.

उद्धव ठाकरे यांच्या मालकीचे सामना वृत्तपत्र आणि मार्मिक साप्ताहिकाने कोरोना काळात कोट्यवधी रुपये कमावले. त्याच्याप्रमाणे ठाकरेंकडे मुंबईत कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असून त्यांनी त्यांच्या व्यवसायाच्या उत्पन्नाचे अधिकृत स्रोत उघड केलेले नाहीत. त्यामुळे सीबीआय किंवा ईडीमार्फत त्यांची चौकशी करण्याची मागणी अभय भिडे यांनी याचिकेच्या माध्यमातून केली होती. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती रणजित भोसले यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली.

अगोदर बाळासाहेबांना अभिवादन अन् नंतर पत्रकार परिषद, राज्याच लक्ष लागलेल्या युतीची आज घोषणा

या याचिकेमध्ये ज्या मागण्या केल्या आहेत, तशाच मागण्या करणारी याचिका तीन वर्षांपूर्वी उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे त्याच मागण्यांसाठी करण्यात आलेल्या नव्या याचिकेवर सुनावणी घेण्यात अर्थ नाही. ही याचिका सुनावणीयोग्य नाही, असे म्हणत न्यायालयाने भिडे यांना कायदेशीर सल्ला घेण्याची सूचना केली. तीन वर्षांपूर्वी भिडे यांच्या मुलीने न्यायालयात ठाकरे यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. याचिका केवळ तर्कावर आधारित असून, केलेल्या आरोपांच्या समर्थनार्थ कोणतेही पुरावे नसल्याचे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने तीन वर्षांपूर्वी भिडे यांच्या मुलीची याचिका फेटाळली होती.

follow us