हिंदी सक्तीची हा भाजपचा कट; मराठी अभ्यास केंद्राच्या अध्यक्षांचा खळबळजनक आरोप

हिंदी सक्तीची हा भाजपचा कट; मराठी अभ्यास केंद्राच्या अध्यक्षांचा खळबळजनक आरोप

BJP’s conspiracy to force Hindi Deepak Pawar allegations : महाराष्ट्रात पहिले ते पाचवी तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकारकडून केला जात (Hindi Language Controversy) आहे. सरकारच्या या भूमिकेच्या विरोधात तीव्र पडसाद राज्यभर उमटत आहे. महाराष्ट्रात हिंदी सक्तीची हा भाजपाचा (bjp) कट असल्याचा आरोप मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार (Deepak Pawar) यांनी केला आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणी करण्यासाठी अशा प्रकारचा निर्णय घेतला असल्याचं सनदी अधिकारी राहुल रेखावर यांनी म्हटले आहे. रेखावार हे या निर्णया संदर्भातले रिमोट कंट्रोल आहे, असा दावा दीपक पवार यांनी केला आहे. मात्र राष्ट्रीय शिक्षण धोरण असं सांगते की, मुलांना आठवीपर्यंत मातृभाषच शिकवलं पाहिजे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे तुम्ही जर पाईक असाल, तर महाराष्ट्रातील इतर भाषांच्या शाळा आठवीपर्यंतच्या बंद करून त्या मराठी कराव्यात. मात्र, त्यांनी ते केलेले नाही.

माझ्यासारखी वेळ कोणत्याच मुलीवर येऊ नये; अभिनेत्री करिश्मा कपूर असं का म्हणाली?

NEP सांगते की, पहिली भाषा प्राथमिकमध्ये, दुसरी पाचवीनंतर, तर तिसरी भाषा आठवीनंतर शिकवावी. तशा प्रकारे शिकवलं जात आहे. खेल खेल में हिंदी, असा आणण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. आपल्याकडे राक्षसी बहुमत असल्यामुळे आपलं कोणी काही करू शकणार नाही, असा विश्वास सरकारला आहे. मात्र, अनपेक्षित या निर्णयाच्या विरोधात लोकांचा रोष त्यांना पत्करावा लागत आहे. राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी या विरोधात भूमिका घेतल्यामुळे सरकारला दोन पावले मागे जावे लागले. शासन निर्णयात शब्द छल केलेला आहे.

Malegaon Election : ‘मी त्यांच्या आरोपाला उत्तर द्यायला रिकामा नाही’ अजित पवारांचे सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर

मुख्यमंत्री म्हणतात स्थगिती दिली. शालेय शिक्षण मंत्री म्हणतात अनिवार्य शब्द काढला. मात्र, हे सगळं तोंडी बोलतात. यावर जनता विश्वास ठेवायला तयार नाही. त्यामुळे दोन 17 जूनला काढलेला जी आर नसून ते शुद्धिपत्रक असल्याचा आरोप दिपक पवार यांनी केला आहे. हे असे वाचावे, त्यात म्हटले आहे. हिंदी ही अनिवार्य नसून ही सर्वसाधारण भाषा आहे, असं वाचावं. संस्थाचालकांना दाबात घेऊन आपण हिंदी सक्तीचीच करू, असा यांना विश्वास आहे. त्यामुळे हिंदी भाषेची शक्ती हा महाराष्ट्र विरोधातील भाजपाचा कट असल्याचा आरोप दीपक पवार यांनी केला आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube