राज्यसभेच्या दोन्ही जागा महायुतीकडे, राज्यात धैर्यशील पाटील, नितीन पाटील यांची बिनविरोध निवड
Mahayuti candidate Unopposed on Rajya Sabha : राज्यातील राज्यसभेच्या दोन जागांच्या निवडणुकीची चर्चा होती. आता या दोन्ही जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नितीन पाटील आणि भाजपाचे धैर्यशील पाटील (Rajya Sabha) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याव्यतिरिक्त अन्य दोन अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. पण शेवटी नितीन पाटील आणि धैर्यशील पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
महाराष्ट्र नक्की हे काय घडतय? अनाथाश्रमातील तरुणींना वेश्याव्यवसायात ढकललं, साताऱ्यातील घटना
राज्यसभेच्या दोन जागांसाठीच्या निवडणुकीला भाजपा पक्षाकडून धैर्यशील पाटील यांना तिकीट देण्यात आलं होतं. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नितीन पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत दोन अपक्षांनी तीन उमेदवारी अर्ज दाखल केले होते. परंतु अर्जाच्या पडताळणीमध्ये अपक्षांच्या वतीने भरण्यात आलेल्या अर्जावर अनुमोदकांच्या साह्या नसल्याचं समोर आलं. त्यामुळे हे तिन्ही उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आले. सोमवारी राष्ट्रवादी आणि भाजपाच्या उमेदवारांना राज्यसभेवर नियुक्त झाल्याचं प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
आश्वासन पूर्ण केलं
लोकसभा निवडणुकीदरम्यान, राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी साताऱ्यातील वाई येथे सभा घेतली होती. साताऱ्याच्या जागेवरून महायुतीचा उमेदवार निवडून आल्यास नितीन पाटील यांना खासदार करतो, असं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर नितीन पाटील यांना खासदारकीची संधी कधी मिळणार, याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीत अजित पवार यांनी नितीन पाटील यांना तिकीट दिलं आणि आणि आपलं आश्वासन पूर्ण केलं अशी चर्चा आहे.
बदलापूर प्रकरण : अक्षय शिंदे गतीमंद? तीन लग्न झालीत का?; आई-वडिलांच्या दाव्याने नवा ट्विस्ट
जिल्हाध्यक्ष होते
भाजपाने धैर्यशील पाटील यांना उमेदवारी दिली होती. धैर्यशील पाटील हे मूळचे रायगड जिल्ह्यातील आहेत. धैर्यशील पाटील हे माजी आमदार आहेत. सध्या ते रायगड जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांनी याआधी रायगड, रत्नागिरी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी चालू केली होती. परंतु, तेव्हा त्यांना तिकीट मिळाले नाही. मात्र, आता त्यांना राज्यसभेच्या रुपात खासदारकी मिळणार आहे.