Video : आता थांबायचं नाही..पाणी मिळवणारच; संभाजीनगरमधून आदित्य ठाकरेंचा भाजपवर ‘हल्ला’

Video : आता थांबायचं नाही..पाणी मिळवणारच; संभाजीनगरमधून आदित्य ठाकरेंचा भाजपवर ‘हल्ला’

Aditya Thackeray In Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरच्या पाणी प्रश्नाला कोणत्याही वचनांची पूर्तता न करणारे भाजप सरकार जबाबदार आहे. हे सरकारी अपयश आहे, असा हल्लाबोल ठाकरेसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Thackeray) यांनी केला. या सरकारने अनेक वचने दिले, पण त्याची पूर्तता केली नाही. राज्यात नागरिक, शेतकरी, महिला सर्वांवर अन्याय वाढत आहे असा ही घणाघात त्यांनी केला. ते आज शुक्रवार (दि. १६ मे)रोजी छत्रपती संभाजीनगर येथे हल्लाबोल या मोर्चात लबाडांनो पाणी द्या असं म्हणत काढलेल्या मोर्चात बोलत होते.

सरकारकडून कोणतीही वचनपूर्ती होत नाही. पाणी प्रश्नांवर आमच्यावर टीका करणाऱ्यांनी थोडी तरी लाज बाळगावी, अशी सडेतोड टीकाही  त्यांनी यावेळी शिंदेसेना आणि भाजपवर यावेळी केली. मागील महिनाभरापासून शहर पाणीप्रश्नावर ठाकरेसेनेचे लबाडांनो पाणी द्या हे आंदोलन सुरू आहे. शहरातील विविध भागात कार्यकर्त्यांनी आंदोलन करत पाणी प्रश्नावर संताप व्यक्त केला. या आंदोलनांचा समारोप आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज महापालिकेवर हल्लाबोल माेर्चा नेऊन करण्यात आला.

शाहांना ईडीचा बांबू लावला तर शिवसेनेत येतील; संजय राऊतांनी सांगितली भाजपची स्ट्रॅटेजी

काही काळापूर्वी सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते आमचं सरकार येऊद्या दोन दिवसांत तुम्हाला पाणी देतो या वाक्याची आठवण आदित्य ठाकरे यांनी काढत फडणवीस यांच्यावर थेट टीका केली. सध्या मुख्यमंत्री फडणवीस यांना वेळच नाही. दोन्ही सोबतचे गट भांडत आहेत. त्यातून हे कसे बाहेर पडणार आहेत. जरा माणसाकंड माणूस म्हणून पाहा. जरा सामान्य माणसांकडं पाहा. त्यांना पाणी द्या. असं म्हणत आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. तसंच, पाणी नसल्याने अनेक लोक त्रस्त आहेत. परंतु, भाजपला फक्त राजकारण सुचतय असंही ठाकरे यावेळी म्हणाले.

क्रांती चौकातून सायंकाळी मोर्चास सुरुवात झाली. लबाडांनो पाणी द्या, असे बॅनर हातात घेऊन काही आंदोलक सहभागी होते. माजी मंत्री आदित्य ठाकरे, विधान परिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह आंदोलक जोरदार घोषणाबाजी करत महापालिकेकडे रवाना झाले. नवीन पाणी पुरवठा योजना १६८० कोटी रुपयांची होती. नंतर ती २७४०कोटी रुपयांची कशी झाली, असा सवाल आ. अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा मार्गी लागलेले काम आता अत्यंत संथगतीने चालू आहे. या योजनेचे काम ३ फेब्रुवारी २०२४ रोजी पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, सत्ताधाऱ्याचा वचक नसल्याने योजनेचे काम दोन वर्ष पूर्ण होऊ शकत नसल्याचे दानवे यावेळी म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube