Video : धनंजय मुंडेंना राजीनामा देण्यासाठी धमकी दिली का? CM फडणवीसांनी खरं खरं सांगून टाकलं…

Devendra Fadnavis : धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना अखेर राजीनामा द्यावा लागला. संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याकांडाचे अत्यंत संतापजनक फोटो आल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळातही मोठ्या घडामोडी घडल्या आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना मंत्रिमंडळातून बाहेर जावं लागलं. दरम्यान, मुंडेंना राजीनामा द्यायला इतके दिवस का लागले? असा सवाल विरोधक करत आहेत. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis) यांनी भाष्यं केल.
मोठी बातमी! अमरनाथ यात्रा 2025 साठी वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या सर्वकाही…
एका वृत्त वाहिनीला मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुलाखत दिली. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. धनंजय मुंडेंनी संतोष देशमुख हत्या प्रकरण होऊन तीन महिने झाल्यानंतर राजीनामा दिला. त्यांना राजीनामा देण्यासाठी धमकी द्यावी लागली का, असा सवाल फडणवीस यांनी केला असता ते म्हणाले की, धनंजय मुंडे यांचा राजीनामा योग्य वेळी झाला की, चुकीच्या वेळी झाला. याच्या चर्चेत मी जात नाही. राजकारणात, पहिल्या दिवशी राजीनामा घेतला किंवा शेवटच्या दिवशी घेतला तरी लोकांना जे बोलायचं तेच लोक बोलतात. या हत्येतील जे फोटो समोर आले, ज्या प्रकारे हत्या झाली आणि हत्येचा मास्टरमाईंड ज्याला म्हटलं गेलं, तो मंत्र्यांचा इतका जवळ होता की, मंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारे दिला पाहिजे. युतीचं सरकार असल्याने आम्हाला निर्णय घ्यालायला उशीर झाला. पण आम्ही फर्मली डील केलं आणि मुंडेंनी राजीनामा दिला, असं फडणवीस म्हणाले.
खुशखबर! सोनप्रयाग ते केदारनाथ केवळ 36 मिनिटांत, मोदी मंत्रिमंडळाने घेतला मोठा निर्णय
मुंडेंना राजीनामा देण्यासाठी धमकी द्यावी लागली का, असा सवाल केला असता फडणवीसांनी दोन वाक्यांत उत्तर दिले. मला जे सांगायचं होतं, ते मी सांगितलं. त्या उपर सांगण योग्य नाही, असं म्हणत त्यांनी अधिक भाष्य करण्यास नकार दिला.
पुढं ते म्हणाले, लोक फक्त टीका करतात. त्यांना व्यवस्था समजत नाही. ज्यावेळी ही घटना घडली. त्यानंतर मी सीआयडीची चौकशी लावली. मी सीआयडीच्या लोकांना सांगितलं की, या तपासात कोणताही हस्तक्षेप केला जाणार नाही. तुम्ही पूर्ण क्षमतेने तपास करा. सीआयडीने चांगला तपास केला. आमच्या फॉरेन्सिक टीमने डिलीट केलेले, हरवलेले मोबाईल शोधले. तसेच त्यांनी डिलीट झालेला डेटा पुन्हा मिळवला. त्यामुळं देशमुख हत्या प्रकरणाचे फोटोही समोर आले. ते फोटो कोणी शोधले नाही, तर ते चार्चशीटमधील आहेत. सीआयडीच्या तपासात कोणाही हस्तक्षेप केला नाही, असं फडणवीस म्हणाले.
मीही हस्तक्षेप केला नाही…
फडणवीस म्हणाले, ज्या दिवशी आरोपपत्र दाखल झाले, त्यावेळी मला कळलं काय तपास आहे. पण तोपर्यंत मी गृहमंत्री असूनही कधी सीआयडीला माहिती मागितली नाही. मी फोटोही पाहिली नाहीत. मीच तपास निष्पक्ष होण्यासाठी आग्रही होतो, त्यामुळं दुसऱ्या कुणाचीही हस्तक्षेप करण्याची हिमत झाली नाही, असं फडणवीस म्हणाले.