Parbhani violence : आकसबुद्धीने कारवाई होणार नाही; मात्र, दिसले ते सुटणार नाहीत

  • Written By: Published:
Parbhani violence : आकसबुद्धीने कारवाई होणार नाही; मात्र, दिसले ते सुटणार नाहीत

CM Fadnavis on Beed Sarpanch Murder : परभणीत एका मनोरुग्णाने ज्याप्रकारे भारताच्या संविधानाचा अपमान केला, त्या मनोरुग्णाला अटक करण्यात आली. त्यानंतर दुर्दैवाने उद्रेक झाला. (Parbhani violence) मला यानिमित्ताने विनंती करायची आहे की, एका मनोरुग्णाच्या कृत्यावर असंवैधानिक पद्धतीने उद्रेक करणं योग्य नाही. ते डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांना मंजूर झालं नसतं. हे सरकार संविधानाचा सर्वोच्च सन्मान करणारं आहे. तसंच, राज्यातील जातीयवादी आंदोलनांच्या माध्यमातून मला टार्गेट करणाऱ्यांना निवडणुकीतून उत्तर मिळालं आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नागपूर येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मंत्रिमंडळात पश्चिम महाराष्ट्राचा दबदबा, दहा मंत्रिपदे; विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात आठ मंत्री

राज्यातील मराठा आंदोलन, परभणीतील उद्रेक अशा जातीयवादी आंदोलनातून तुम्हाला टार्गेट केलं जातं, असा प्रश्न यावेळी देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना फडणवीस यांनी म्हटलं की, मला टार्गेट करण्याच्या संदर्भात जो विषय त्याचं उत्तर या निवडणुकीने दिलंय. परभणी हिंसाचार प्रकरणात सगळी कारवाई केली आहे. आम्ही पोलिसांना सांगितलं आहे की, आकसबुद्धीने कारवाई करु नका. पण कोम्बिंग ऑपरेशन करु नका. पण जे लोक कॅमेऱ्यात लाठ्याकाठ्या घेऊन तोडफोड करताना आणि दगड मारताना दिसत आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे, असही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणालेत.

बीडमधील सरपंच संतोष देशमुख प्रकरणात काय कारवाई करणार? यावर बोलताना ते म्हणाले, काही दिवसांपूर्वी बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करुन हत्या करण्यात आली. बीड जिल्ह्यात एका सरपंचाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. यासंदर्भात काही लोकांवर कारवाई झाली आहे, काहींना निलंबित करण्यात आलं आहे, काही लोकांना घरी पाठवण्यात आलं आहे. पोलिसांनी 3 आरोपींना पकडलं आहे, 4 आरोपींचा शोध सुरु आहे. हे प्रकरण सीआयडीकडे सोपवलं असून चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. आम्ही सगळी चौकशी करणार आहोत. कुठल्याही परिस्थितीत आरोपी कोणीही असो, कुठल्याचा आरोपीला सोडलं जाणार नाही असं फडणवीस म्हणालेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube