लाडकी बहीण योजनेबाबत CM शिंदेंचं मोठं विधान, म्हणाले, ‘ही योजना कधीही…’
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) तोंडावर राज्यातील महायुती सरकारने (Mahayuti) महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) आणली. मात्र, ही योजना बंद पडेल, अशी टीका विरोधक करत आहे. दरम्यान, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) या योजनेबद्दल महत्वपूर्ण विधान करत विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिल.
मोठी बातमी! मल्लिकार्जुन खरगेंची तब्येत बिघडली, भाषण करताना आली भोवळ
पुणे मेट्रोच्या शिवाजीनगर दिवाणी न्यायालय ते स्वारगेट या भूमिगत मेट्रोचे आज उद्घाटन करण्यात आले. त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आले. तत्पूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी विविध विषयांवर भाष्य केले. ते म्हणाले, काही लोक टीका करत आहेत की, लाडकी बहीण योजना बंद पडेल. पण, मी माझ्या लाडक्या बहीणींना सांगू इच्छितो की, बहिणींनो, घाबरू नका. ही योजना कधीही बंद पडणार नाही. ही योजना संसाराला हातभार लावणारी आहे, असं सीएम शिंदे म्हणाले.
‘लेबनॉन अन् गाझातील हल्ले तत्काळ थांबवा’; चीनने इस्त्रायलला घेरलं
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. पुढं बोलतांना शिंदे म्हणाले, या योजनेचा राज्यातील लाडक्या बहिणींच्या कुटुंबांना हातभार लागणार आहे. लाडक्या बहिणींच्या संसाराला हातभार लावण्यासाठीची ही योजना आहे. आता लाडक्या बहीण योजनेत खोडा घालणाऱ्यांना बहिणी जोडा दाखवतील, असा टोला विरोधकांनी शिंदेंना लगावला.
पोलिसांची बंदूक काय शोसाठी ठेवली का?
एकनाथ शिंदे म्हणाले की, बदलापूरच्या घटनेनंतर विरोधक आरोपींना फाशी द्या असे म्हणत आहेत. त्यानंतर आरोपी जेव्हा गोळीबार करतो तेव्हा पोलिसांनी बंदुक शोकेसमध्ये ठेवायची का? पोलिसांनी समजा ते केलं नसतं तर विरोधकच म्हणाले असते की, चार लोक असून आरोपी गोळीबार करून पळून गेला. मग पोलिसांची बंदूक काय शोसाठी ठेवली का? म्हणजे विरोधक इकडून पण बोलतात, तिकडूनही बोलतात, त्यांनी दोन्ही बाजूंनी बोलायची सवयच आहे, असं सीएम शिंदे म्हणाले.