जनसुरक्षा कायदा कायद्याला विरोध करणारे संविधानविरोधी; CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

जनसुरक्षा कायदा कायद्याला विरोध करणारे संविधानविरोधी; CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

Devendra Fadnavis : जनसुरक्षा कायदा (Jansuraksha Act) विधीमंडळात मंजूर झाला असून लवकरच त्याचं कायद्यात रुपांतर होणार आहे. परंतु राज्यात अजूनही या कायद्याला तीव्र विरोध होत आहे. यावरून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. या कायद्याला विरोध करणाऱ्या 99 टक्के लाोकांनी हे विधेयकच वाचलेल नाही, विरोध करणारे संविधानविरोधी आहेत, अशी टीका फडणवीसांनी केलाी.

Video : धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपद देण्याची चर्चा; खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं मोठं विधान 

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत वर्ध्यात भाजप कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, विशेष जनसुरक्षा कायदा हा आंदोलन चिरडण्यासाठी तयार करण्यात आलाय, हा कायदा लोकशाहीविरोधी आहे, असं नॅरेटिव्ह विऱोधक पेरण्याचा प्रयत्न करत आहे. या कायद्याबाबत जाणूनबुजून संभ्रम पसरवत आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान निर्माण केलंय, त्या संविधानाला नाकारून ते अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. जे लोक या कायद्याला विरोध करत आहेत, त्यांचा भारताच्या संविधानाला विरोध आहे. तसंच भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या व्यवस्थेला विरोध आहे, असं ते म्हणाले.

विरोधकांनी कायदा वाचलेला नाही…
फडणवीस म्हणाले, या कायद्याला विरोध करणाऱ्यांसोबत ओपन डिबेट करायला आम्ही तयार आहोत. माझा तर दावा आहे, या कायद्यावर जे लोक बोलत आहे, त्यातील 99 टक्के लोकांनी हा कायदाच वाचलेला नाही.

VIDEO : अजित पवार पहाटे उठतात, पण… हिंजवडीचे प्रश्न सुटणार का? खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल 

यावेळी फडणवीसांनी कार्यकर्ते आणि नेत्यांच्या कान उपटले. ते म्हणाले, माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की, राज्यात आपल्यासाठी अनुकूलता आहे. लोक आपल्याला निवडून द्यायला तयार आहेत. पण, भाजप पक्ष म्हणून अनेक जिल्ह्यांत लहानसहान वाद आहेत. हे वाद नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये आहेत. हे वाद फार मोठे नाहीत. भाजप एक परिवार आहे. कुटुंबात कमी जास्त होत असते. पण, निवडणुकीच्या तोंडावर सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे. एकत्र बसलं पाहिजे आणि वाद संपवले पाहिजेत. हे बघा, एकमेकांच्या चढाओढीमुळं अनेक पक्ष संपले. असे प्रकार आपल्या पक्षात होऊ नयेत. जर कोणी पक्षाला खड्ड्यात घालण्याचं काम करणार असेल, तर त्याला खड्डयात घालण्याचं काम पक्ष करेलं, हे लक्षात ठेवा, असा इशारा फडणवीसांनी दिला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube