राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वित्त ते जलसंपदा विविध विभागांवर महत्त्वाचे निर्णय!

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वित्त ते जलसंपदा विविध विभागांवर महत्त्वाचे निर्णय!

Decisions on Various Departments in the State Cabinet Meeting : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यामध्ये विविध विभागांवर निर्णय घेण्यात आले. तसेच या बैठकीमध्ये डान्सबार बंदीवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय!

• कृष्णा-कोयना उपसा सिंचन योजनेअंतर्गत म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे व योजनेची ऊर्जा कार्यक्षमता सुधारण्यासाठी 1 हजार 594 कोटी रुपयांना आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या प्रकल्पामुळे योजनेसाठी लागणाऱ्या दरवर्षी सुमारे 398 दशलक्ष युनीट वीजेची गरज भागवली जाणार आहे.

सलग दुसऱ्यांदा प्रियदर्शनी विद्या मंदिर जाधवर आंतरशालेय क्रीडा करंडकाचे मानकरी

• राज्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स स्थापन करण्यास तसेच त्याकरिताच्या 346 पदांना व त्यासाठीच्या खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. राज्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स स्थापन करण्यासाठी 31 ऑगस्ट 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आली आहे.

शिवजयंती निमित्त गर्भसंस्कारांवर आधारीत डॉ. विष्णू माने यांचा जिजाऊंचे बाळकडू कार्यक्रम

• सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मान्यता देण्यात आली. हा आयोग 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 या पाच वर्षांच्या कालावधीसाठी शिफारशी करेल. या शिफारशींबाबत अहवाल सादर करण्यास या आयोगाला 31 डिसेंबर 2025 पर्यंतची मुदत असेल.

अनैतिक संबंधांतून संतोष देशमुखांची हत्या दाखवण्याचा कट, देशमुख कुटुंबाचा पोलिसांवर खळबळजनक आरोप

• राज्यातील रोपवेच्या कामांसाठी राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन लि. (NHLML) ला आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यास मान्यता. (सार्वजनिक बांधकाम विभाग)

“कुस्ती स्पर्धा म्हणजे बारामती अॅग्रो नाही, राम शिंदेंमुळे..”, आ. जगतापांचा रोहित पवारांना खोचक टोला

• जळगांव जिल्ह्यामधील चाळीसगांव तालुक्यातील वरखेडे लोंढे (बॅरेज) मध्यम प्रकल्पाच्या 1 हजार 275 कोटी 78 लाख रुपयांच्या तरतूदीस मान्यता. चाळीसगाव, भडगाव तालुक्यातील 8 हजार 290 हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा. (जलसंपदा विभाग) हा प्रकल्प तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगांव अंतर्गत गिरणा नदीवर मौजे वरखेडे बु. येथून दीड किलोमीटरवर आहे.

• पुण्यातील दीनानाथ मंगेशकर फाऊंडेशन हॉस्पिटल, मेडिकल रिसर्च सेंटरला नाल्यावरील पुलाच्या बांधकामासाठी जमीन नाममात्र दराने वार्षिक भाडेपट्ट्याने देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली. या ट्रस्टला हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटरसाठी मौ. एरंडवणा येथे जमीन देण्यात आली आहे. या शिवाय ट्रस्टने मौजे कर्वेनगर येथील जमीन खरेदी केली आहे. या दोन्ही मिळकतीच्या दरम्यान हा नाला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube