मुंबईत काही तरी मोठं घडणार; जरांगे मुंबईकडे निघताच उपमुख्यमंत्री शिंदेंचा दरे गावाचा दौरा रद्द

मुंबईत काही तरी मोठं घडणार; जरांगे मुंबईकडे निघताच उपमुख्यमंत्री शिंदेंचा दरे गावाचा दौरा रद्द

Maratha Reservation :  राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चर्चेत आला आहे. मराठा आरक्षणाची मागणी करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मुंबईत (Mumbai) आरक्षणासाठी 29 ऑगस्टपासून आंदोलन करणार आहे. यासाठी आज जरांगे पाटील अंतरवली सराटी (Antarvali Sarati) येथून मुंबईसाठी निघाले आहे. तर दुसरीकडे एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपला अचानक दरे गावाचा दौरा रद्द केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशत्सवासाठी आपल्या मुळगावी दरे या ठिकाणी जाणार होते मात्र त्यांनी अचानक आपला दौरा रद्द केल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

तर दुसरीकडे मनोज जरांगे मुंबईत दाखल होण्यापूर्वी काही तरी मोठं घडणार असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळातून समोर येत आहे. आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आंदोलन सुरु केल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियोजित दौरा रद्द केला असल्याची चर्चा देखील सुरु आहे. मात्र शिंदे यांचा दौरा का रद्द झाला याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

तर दुसरीकडे सरकार मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे जरांगे पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत असल्याने एकनाथ शिंदे काही बोलत नसल्याने राजकीय वर्तुळात महायुतीमध्ये सर्वकाही ठिक नसल्याचा दावा देखील करण्यात येत आहे.

पुण्यात गणेशोत्सवाचा जल्लोष! ढोल-ताशांच्या गजरात शहर दुमदुमलं, PHOTO एकदा पाहाच…

तर दुसरीकडे मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री उदय सामंत आज किंवा उदया मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube