Devendra Fadanvis : ‘भीमाशंकर हेच ज्योतिर्लिंग, त्यावर कोणीही दावा करू शकत नाही’

  • Written By: Published:
Devendra Fadanvis : ‘भीमाशंकर हेच ज्योतिर्लिंग, त्यावर कोणीही दावा करू शकत नाही’

पुणे : देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणजे पुणे (Pune) जिल्ह्यातील भीमाशंकर. (Bhimashankar) मात्र, आता भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचा वाद पेटण्याची शक्यता आहे. भीमाशंकर ज्योतिर्लिंगावर आसाम (Aasam) सरकारने प्रश्न उपस्थित केला. महाराष्ट्रातील भीमाशंकर ज्योतिर्लिंग खरं नसल्याचं आसाम सरकारनं म्हटलं आहे. भीमाशंकरचं सहावं ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात नसून आसाममध्ये असल्याचा दावा आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा (Himanta Biswa Sarma) यांनी केला आहे. याविरोधात आता महाराष्ट्रातील विरोधकांनी आसाम सरकारच्या दाव्यावर जोरदार टीका केली आहे. आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत आपली प्रतिक्रिया दिली. भीमाशंकर ज्योर्तिलिंग हे आपलंच असल्याचं फडणवीस यांन सांगितलं आहे

महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर आसाम सरकारच्या पर्यटन विभागाकडून संकेतस्थळावर एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये भारतातील सहावं ज्योतिर्लिंग असलेल्या, कामरुप डाकिनी पर्वत, आसाम आपलं स्वागत आहे, असा आशय असणारी जाहिरात आहे. याच जाहिरातीमध्ये विविध ज्योतिर्लिंग स्थळांची यादी देखील देण्यात आली आहे. यात भीमाशंकरच्या नावापुढे स्थळाचा उल्लेख ‘डाकिनी’मधील भीमाशंकर असा करण्यात आला आहे. याशिवाय जाहिरातीमध्ये मुख्यमंत्री हिमंत बिश्व शर्मा यांचा फोटोही आहे. आसाम सरकारच्या या अजब दाव्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये हस्तक्षेप करावा, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येतेय.

…तर हे लोकं सुपारी देऊन कोणालाही, ‘त्या’ ऑडिओ क्लिपवर जितेंद्र आव्हाड बोलले

दरम्यान, या वादावर आता देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलं. पुण्याच्या दौऱ्यावर असतांना पत्रकारांनी त्यांना भीमाशंकर विषयी प्रश्न विचारले. त्यावेळी त्यांनी सांगितले की, असा दावा कोणीही करू शकत नाही. श्री क्षेत्र भीमाशंकर हे आपलं आहे. भीमाशंकर हेच ज्योर्तिलींग आहे. कोणी कुठला दावा केल्यामुळे त्याच्यात काही परिणाम होणार नाही. आपलं भीमाशंकर हे शतकानुशतकं ज्योर्तिलींग मानल्या गेलं आहे. उगीच दुसऱ्यांच्या वक्तव्याला गांभीर्याने घेऊन आपण त्याचं महत्व का वाढवतो, असं फडणवीस म्हणाले.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube