Devendra Fadanvis दिल्लीतून थेट चिंचवडला… शंकर जगतापांच्या कानात काय सांगितलं ?

Devendra Fadanvis दिल्लीतून थेट चिंचवडला… शंकर जगतापांच्या कानात काय सांगितलं ?

पुणे : आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचे निधन झाल्याने चिंचवड विधानसभा (Chinchwad Bypoll Election) पोटनिवडणुकीचा तयारी सध्या सुरु असून या जागेवर उमेदवारी ही जगताप यांच्या घरातच मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे. मात्र, ही उमेदवारी नक्की कोणाला मिळणार याकडे लक्ष लागले आहे. यावरून सध्या चर्चा रंगत असतानाच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी अचानकपणे थेट दिल्लीवरुन येऊन चिंचवड येथे शंकर जगताप (Shankar Jagtap) यांना भेट देऊन त्यांच्या कानात काय सांगितले, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे उमेदवारी शंकर जगताप यांना मिळणार की लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांना मिळणार याची उत्सुकता लागली आहे.

भाजपकडून चिंचवड पोटनिवडणुकीसाठी लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी किंवा बंधु शंकर जगताप यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत अश्विनी जगताप उभ्या राहिल्या, तर ही निवडणूक बिनविरोध होईल असे महाविकास आघाडील पक्षांची भूमिका आहे. त्यामुळे शंकर जगताप यांना उमेदवारी मागे घेण्याबाबत मनधरणी करायला देवेंद्र फडणवीस आले असल्याची चर्चा रंगली आहे.

दिल्लीवरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे थेट दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या घरी आले. तिथे फडणवीस यांनी शंकर जगताप यांची भेट घेतली. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. याबाबत शंकर जगताप यांनी सांगितले की, आमच्यात बंद दाराआड कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. शोक सभेनंतर फडणवीस यांना आमच्या घरी यायचे होते. मात्र, वेळेअभावी त्यांना येता आले नाही म्हणून आज केवळ सांत्वन करण्यासाठी ते घरी आले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube