मोठी बातमी : कौटुंबिक हिंसाचारप्रकरणात धनंजय मुंडेंना धक्का; करूणा शर्मांना द्यावी लागणार दोन लाख पोटगी
Dhananjay Munde Found Guilty In Domestic Violence Case Filed By Karuna Sharma : कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना न्यायालयाने दोषी ठरविले आहे. करूणा शर्मा (Karuna Sharma) यांनी केलेले आरोप कोर्टाने अंशतः मान्य केले आहेत. तसेच धनंजय मुंडेंना करूणा यांना दर महिन्याला दोन लाखांची पोटगी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मुंबईतील वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. या प्रकरणावर अद्याप धनंजय मुंडे यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
धनंजय मुंडेंच्या मागचे शुक्लकाष्ठ संपेना… आणखी एक प्रकरणात अडचणीत येण्याची शक्यता
पहिल्या पत्नी असल्याचेही कोर्टाने केले मान्य
करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी असल्याचा दावा करत पोटगीची मागणी केली होती. न्यायालयाने हे मान्य करत त्यांना पोटगीचा निर्णय दिला आहे. विशेष म्हणजे, या निकालाद्वारे करुणा शर्मा या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असल्याचेही कोर्टाने मान्य केले आहे. त्यामुळे या प्रकरणामुळे धनंजय मुंडेंवरील राजकीय आणि व्यक्तिगत दबाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
एका महिलेसाठी पतीशिवाय जीवन जगणे खूप कठीण असते
या निकालावर प्रतिक्रिया देताना करुणा शर्मा म्हणाल्या, “गेल्या तीन वर्षांत मी खूप त्रास सहन केला. पोटगी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. एका महिलेसाठी पतीशिवाय जीवन जगणे खूप कठीण असते, विशेषतः जेव्हा पती उच्च पदावर असतो आणि संपूर्ण व्यवस्था त्याच्या बाजूने काम करत असते. मोठे वकील असूनही मी ही लढाई लढली आणि अखेर न्याय मिळाला. माझ्या वकिलांचे मी मनःपूर्वक आभार मानते.”
Video : मंत्री धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात; सुप्रिया सुळेंनी पीक विमा घोटाळा मांडला लोकसभेत
15 लाख रुपयांच्या पोटगीची मागणी
वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर करूणा शर्मा यांनी कोर्टाचे आभार मानले आहेत. कोर्टाने धनंजय मुंडे यांना पोटगी म्हणून दरमहा दोन लाख रूपये पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, माझ्यासोबत मुलंदेखील असल्याने मी दरमहा 15 लाख रूपये देण्याची मागणी केली होती. मात्र, कोर्टाने 2 लाख रुपये प्रतिमहा पोटगी देण्याचे आदेश दिले असून, दरमहा 15 लाख पोटगी मिळावी यासाठी आता मी पुन्हा हायकोर्टात जाणार असल्याचे करूणा शर्मा यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.
कोर्टाचा निकाल नेमका काय?
धनंजय मुंडे यांना दोषी ठरवताना न्यायालयाने या प्रकरणाचा शेवटचा निकाल येईपर्यंत मुंडेंनी घरगुती हिंसाचार करू नये. करूणा शर्मा यांना महिन्याला 1 लाख 25 हजार रूपये पोटगी म्हणून द्यावे. तसेच त्यांची मुलगी शिवानी मुंडेला दरमहा 75 हजार रूपये लग्नापर्यंत देण्याचे निर्देश न्यायालयाने धनंजय मुंडेंना दिले आहेत. हे पैसे खटला सुरू झाल्यापासून आत्तापर्यंतच्या हिशोबाने द्यावेत असेही न्यायालयाने म्हटले आहे. शिवाय या खटल्याचा 25 हजार रूपयांचा खर्च धनंजय मुंडेंनी करूणा शर्मा यांना द्यावा असेही कोर्टाने आदेशात म्हटले आहे.
करूणा शर्मांच्या गाडीत पिस्तुल; सुरेश धस यांनी लावून धरलेलं प्रकरण काय? बुरखाधारी महिला कोण?
दमानिया यांच्याकडून करूणा शर्मांचे अभिनंदन
दरम्यान, करूणा शर्मा यांच्या बाजूने निकाल लागल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक्सवर पोस्ट करत करूणा शर्मा यांचे अभिनंदन केले आहे. ज्यात त्या म्हणतात की, करुणा मुंडे या फैमिली कोर्टात ४ फेब्रुवारी रोजी केस जिंकल्या त्याबद्दल एक स्त्री म्हणून त्यांचे अभिनंदन. मी वैयक्तिक विषयावर बोलत नाही आणि ही वैयक्तिक टीका नाही ह्याची नोंद घ्यावी करुणा, ह्या धनजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत, त्यांना मारहाण झाली आहे आणि देखभाल खर्च देण्यात यावा आणि कुठल्याही प्रकारची दुखापत करण्यात येऊ नये असे निर्देश आणि १,२५,००० रुपयाचा मासिक खर्च देण्यात यावा असे निर्देश कोर्टाने दिले आहेत.
करुणा मुंडे या फैमिली कोर्टात ४ फेब्रुवारी रोजी केस जिंकल्या त्याबद्दल एक स्त्री म्हणून त्यांचे अभिनंदन. मी वैयक्तिक विषयावर बोलत नाही आणि ही वैयक्तिक टीका नाही ह्याची नोंद घ्यावी
करुणा, ह्या धनजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत, त्यांना मारहाण झाली आहे आणि देखभाल खर्च… pic.twitter.com/URrKRw6B7V
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) February 6, 2025