मोठी बातमी! बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणातील धर्मराज काश्यप अल्पवयीन नाहीच; पोलीस कोठडीत रवानगी

  • Written By: Published:
मोठी बातमी! बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणातील धर्मराज काश्यप अल्पवयीन नाहीच; पोलीस कोठडीत रवानगी

Baba Siddiqui Murder Case : बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अटक केलेल्या दोन आरोपींपैकी (Baba Siddiqui ) धर्मराज काश्यप ऊर्फ रंजन कुमार गुप्ता याने दंडाधिकारी न्यायालयात अल्पवयीन असल्याचा दावा केला होता. मात्र, त्याचा हा दावा खोटा ठरला असून तो अल्पवयीन नसल्याचे समोर आलं आहे.

बाबा सिद्दिकी हत्ये प्रकरणी अटक करण्यात आलेल्या धर्मराज काश्यपचा डाव फसला आहे. चाचणीमध्ये तो अल्पवयीन नसल्याचं निष्पन्न झालं आहे. रविवारी कोर्टात हजर केल्यानंतर काश्यपने आपण सतरा वर्षाचे असल्याचा दावा केला होता. या दाव्या नंतर काश्यपची चाचणी करण्यात आली.

मोठी बातमीः बाबा सिद्धीकी हत्याप्रकरणात पुण्यातून आरोपी अटक, हत्येच्या कटात सहभागी

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या धर्मराज कश्यपचा डाव फसला आहे.ऑस्सफकेशन चाचणीत कश्यप अल्पवयीन नसल्याचं निष्पन्न झाल आहे. रविवारी कोर्टात हजर केलं असता कश्यपने तो १७ वर्षीय आल्याचा दावा केला होता. मात्र, दाव्यानंतर कश्यपची ऑस्सफिकेशन चाचणी करण्याचे होते कोर्टाचे निर्देश दिले होते. ऑस्सफिकेशन चाचणीत कश्यप अल्पवयीन नसल्याच निष्पन्न झाले आहे. यानंतर रात्री कश्यपला कोर्टात हजर करण्यात आलं. कश्यपला देखील 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांना चौकशी करतांना शस्त्रसाठा, दोन मोबाईलसह या आरोपीकडे दोन आधार कार्ड सापडली आहेत. दोन्ही कार्डांवरील छायाचित्रे आरोपीचीच आहेत. एकावर धर्मराज कश्यप, तर दुसऱ्यावर रंजनकुमार गुप्ता असं नाव आहे. दोन्ही कार्डांवरील जन्मतारखेनुसार या आरोपीचे वय १८ आणि २३ असं दिसत आहे. मात्र, दोन्ही कार्ड बनावट असण्याच्या शक्यतेने न्यायालयाने या चाचणीद्वारे आरोपीचे वय स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते. अखेर ऑस्सफिकेशन चाचणीत कश्यप अल्पवयीन नसल्याच निष्पन्न झालं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube