भावी शिक्षकांसाठी शिक्षणमंत्री केसरकरांची मोठी घोषणा, राज्यात लवकरच…

भावी शिक्षकांसाठी शिक्षणमंत्री केसरकरांची मोठी घोषणा, राज्यात लवकरच…

Teacher Recrutment : शिक्षक भरतीसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. दरम्यान, औरंगाबाद उच्च न्यायालयाने स्थगिती उठवल्यानंतर आता राज्यात शिक्षक भरतीचा जीआर काढणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी केली आहे. त्यामुळे आता राज्यातील डीएड, बीएड पदवीधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. (Education Minister Kesarkar’s big announcement for future teachers)

Chandrayaanv- 3 नंतर भारतात ‘मून इकोनॉमी’ ची चर्चा; ‘Avatar’ नुसार चालणार कारभार

शिक्षक भरतीसंदर्भात औरंगाबाद उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. त्यामुळे शिक्षक भरतीचं काम राखून ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर ही भरतीची प्रक्रिया थांबवण्यात आली होती. अखेर आता या भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच राज्यात शिक्षक भरती होणार असल्याचे संकेतच केसरकरांनी दिले आहेत.

‘चाणक्य अन् त्यांची कुटनीती कुटून बारीक करणार’; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार

मंत्री केसरकर म्हणाले, राज्य सरकारकडून भरतीची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. मात्र, औरंगाबाद उच्च न्यायालायाने स्थगिती दिल्यानेच आम्हाला कोणतीच प्रक्रिया करता येत नव्हती. आता औरंगाबाद उच्च न्यायालयाने स्थगिती उठवल्याने शिक्षक भरतीचे परिपत्रक म्हणजे जीआर काढण्यात येणार आहे.

Nitesh Rane : राणेंनी दाखवला ‘तो’ जीआर; म्हणाले, आता पोहरादेवीची माफी कोण मागणार?

दीपक केसरकरांच्या माहितीनूसार राज्यात शिक्षकांची भरती दोन टप्प्यांत करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्यात राज्यात 30 हजार शिक्षकांची भरत करण्यात येणार आहे. तर दुसऱ्या टप्यात 20 हजार शिक्षकांची भरती होणार आहे.

यशस्वीचा वेस्ट इंडिजमध्ये पराक्रम ! पदार्पणात मोठी खेळी करत सुनील गावस्करांची बरोबरी

आम्हाला परवानगी मिळाल्यास शिक्षकांची 100 टक्के भरती करणार असल्याचं केसरकरांनी सांगितलं होतं. पण त्यानंतर शिक्षक भरतीसंदर्भात राज्य सरकारकडून कोणतीही पाऊले उचलण्यात आली नव्हती. आता शिक्षणमंत्र्यांनी केलेल्या घोषणनेनंतर राज्य सरकार भरती प्रक्रिया सुरु करणार असल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, शिक्षक भरती प्रक्रियेला आणखीन एक महिनाभर वेळ लागणार असून अद्यापही शिक्षक सेवेत दाखल होण्यासाठी महिनाभराचा कालावधी लागणार असल्याचं स्पष्ट होत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube