ऑपरेशन टायगर की जागावाटप? एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर; अमित शाहांची घेणार भेट

Eknath Shinde :  राज्यात विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये कोणत्या पक्षाला

Eknath Shinde

Eknath Shinde :  राज्यात विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. या निवडणूकीच्या जागावाटपासाठी महायुतीमध्ये प्राथिमक चर्चा देखील झाली असून भाजपने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 3 ते 4 जागा ऑफर केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या जागावाटपावरुन आता महायुतीमध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरु झाली आहे. यातच जागावाटपाचा तोडगा काढण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल झाले आहेत.

एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेणार असून जागावाटपावर चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच या बैठकीत ऑपरेशन टायगर (Operation Tiger) वर देखील चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, 17 जागांवर होणाऱ्या या निडवणुकीत शिवसेना शिंदे गटकाडून 6 जागांची मागणी करण्यात आली आहे मात्र भाजपकडून (BJP) जास्तीत जास्त 4 जागा देण्याची तयारी असल्याने एकनाथ शिंदे आता यावर तोडगा काढण्यासाठी अमित शाह यांच्याशी चर्चा करणार आहे. तर दुसरीकडे या भेटीदरम्यान अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात ऑपरेशन टायगरवर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमित शाह यांच्या या भेटीनंतर राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप येणार का? एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे खासदार फोडणार का? याबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे.

एक जागेवरून युती अडली?

राजकीय वर्तुळात सुरु असणाऱ्या चर्चांनुसार भाजप आणि शिवसेनेमध्ये सर्व जागांवर एकमत झाले आहे. मात्र भाजपकडून ठाण्याच्या जागेसाठी दावा करण्यात येत आहे आणि ही जागा एकनाथ शिंदे सोडवण्यास तयार नसल्याने चर्चा आडल्याची माहिती समोर येत आहे.

पुणे, कोल्हापूर, रायगडसह ‘या’ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस; अलर्ट जारी-

तर दुसरीकडे 17 जागांसाठी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये भाजप 12, राष्ट्रवादी काँग्रेस 2 आणि शिवसेना शिंदे गट 3 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं जात आहे.

follow us