‘तो’ कॅच अन् आम्ही काढलेली सरकारची ‘विकेट’ कोणी विसरणार नाही, शिंदेंची तुफान फटकेबाजी

‘तो’ कॅच अन् आम्ही काढलेली सरकारची ‘विकेट’ कोणी विसरणार नाही, शिंदेंची तुफान फटकेबाजी

Eknath Shinde On Surykumar Yadav : भारतीय संघाने तब्बल 17 वर्षानंतर टी 20 विश्वचषक जिंकल्याने आज राज्य सरकारकडून मुंबईतील चार खेळाडूंचा सत्कार करण्यात आला आहे. विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, सूर्याकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल यांचा सत्कार करण्यात आला आहे. यावेळी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी तुफान फटकेबाजी केली आहे.

या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सूर्य कुमारचा तो कॅच संपूर्ण देश कधीच विसरणार नाही तसेच दोन वर्षांपूर्वी आमच्या टीमने देखील घेतलेली विकेट कोणीच विसरणार नाही असं म्हणत त्यांनी या कार्यक्रमात राजकीय फटकेबाजी केली.

यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, सामना पाहताना एकावेळी हा सामना आपल्या हातातून निसटला असं वाटत होतं मात्र भारतीय संघाने शानदार कामगिरी करत या सामन्यात विजय मिळवला आणि सूर्य कुमार यादवने त्या दिवशी एकही कॅच लिया लेकिन क्या कॅच लिया. सूर्य कुमारच्या त्या कॅचची आठवण आली तर डेव्हिड मिलर रात्री झोपेतून उठत असेल.

1983 च्या वर्ल्ड कॅप फायनलमध्ये देखील कपिल देव यांनी अशीच कॅच घेतली होती. त्या कॅच सारखा सूर्याचा हा कॅच देखील कोणी कधीच विसरू शकणार नाही.

पुढे राजकीय फटकेबाजी करत एकनाथ शिंदे म्हणाले की, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात चांगली बॅटिंग केली आहे. आमचा राजकारण देखील क्रिकेटप्रमाणे आहे. कधी कोणी कोणाची विकेट घेणार हे सांगता येत नाही. सूर्या कुमारजी तुमचा कॅच जसं कधी कोणी विसरणार नाही तसंच आमच्या 50 जणांच्या टीमने दोन वर्षांपूर्वी काढलेली सरकारची विकेट देखील कोणी विसरणार नाही. असं म्हणत पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना टोला लावला.

भारतीय संघाने अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी-20 विश्वचषक 2024 मध्ये शानदार कामगिरी करत तब्बल 17 वर्षानंतर T20 विश्वचषक चॅम्पियन बनला आहे. टी-20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करून विजेतेपद पटकावले होते.  4 जुलै रोजी भारतीय संघ मायदेशी परतला आहे. त्यामुळे बीसीसीआयकडून वानखेडे स्टेडियमवर बीसीसीआयने भारतीय संघाचा सत्कार करण्यात आला.

मोठी बातमी : शिंदेंनी टीम इंडियासाठी खुली केली तिजोरी; जगज्जेत्या संघाला 11 कोटींचं बक्षीस जाहीर

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज