Maharashtra Politics : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? या नेत्याने केला दावा
मुंबई : पुढच्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहेत. या निवडणुका आता सत्तेत असलेले भाजप आणि शिंदे गट एकत्र लढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याचं अनुषंगाने दोन्ही पक्षाने जोरदार तयारी सुरु केली आहे. यातच शिंदे गटाचे जेष्ठ नेते खासदार गजानन कीर्तिकर यांनी एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचे भाकित केले आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेत आणि राज्यातील किमान 20 महानगरपालिकांमध्ये शिंदे गटाची सत्ता येईल असे देखील यावेळी कीर्तिकर म्हणाले.
‘मी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत तब्बल 45 वर्षे काम केले. त्यांनी मला अनेक पदे दिली. उद्धव ठाकरे यांच्या काळातही मला तीनदा उमेदवारी मिळाली. कारण, माझी उमेदवारी कापण्याची हिंमत उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नव्हती अशी टीका त्यांनी यावेळी ठाकरेंवरती केली. पण बाळासाहेब गेल्यानंतर माझ्यासारख्या जेष्ठ नेत्याला यांनी डावल,’ असे कीर्तिकर म्हणाले.
केंद्रात देखील मला डावलून एका नव्या नेत्याला मंत्रिपद तरी देखील मी शिवसेनेची साथ सोडली नाही. पण एकनाथ शिंदेंनी यांनी उठाव केल्यानंतर मी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत जाऊन स्वतःची विचारधारा बदलली. 40 आमदारांनी खोक्यांसाठी बंड केले नसून त्यांनी उठाव केला आहे. असेही गजानन कीर्तिकर यावेळी बोलताना म्हणाले.
खासदार गजानन कीर्तिकर यांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाविषयी भाकित व्यक्त केले आहे. ते म्हणाले -‘मुंबई महापालिकेवर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचाच महापौर बसणार आहे. त्यानंतर 2024 होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी हेच पीएमपदी निवडून येतील. तसेच विधानसभा निवडणुकीनंतरही एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री कायम राहतील.’