होळीच्या दिवशी तरी.., मुख्यमंत्री शिंदेंच्या आधी शुभेच्छा नंतर अप्रत्यक्ष टोला
मुंबई : आजचा होळीचा चांगला दिवस आहे, चांगलं काहीतरी बोला, असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याबाबत विचारल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी राऊत यांचं नाव न घेता अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
आज मुख्यमंत्री शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी यंदा पहिल्यांदाच होळी साजरी करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते होलिका मातेचे पूजन करुन वंदन करण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी मागील पाच वर्षातून यंदा पहिल्यांदाच होळी साजरी करण्यात आली आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील जनतेला होळी सणाच्या शुभेच्छा दिल्या असून जनतेला सुख-समृद्धी आनंद येऊ द्या, जनतेच्या जीवनात असेच विविध रंग उधळू दे, अशा शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
ठाण्यात पुन्हा ठाकरे आणि शिंदे गट भिडले; जाणून घ्या वादाचे कारण
तसेच राज्यातील नूकसानग्रस्त शेतकऱ्यांना हे सरकार वाऱ्यावर सोडणार नसून हे सरकार शेतकऱ्यांच्या सोबत आहे. त्यांना वाऱ्यावर सोडणार नसून ज्या शेतकऱ्यांचं नूकसान झालंय, त्या शेतकऱ्यांची काळजी घेणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री शिंदेंनी दिलंय.
मानाची काठी कळसाला भेटवून मढी यात्रेला सुरुवात
महाराष्ट्रातील काही भागांत अवकाळी पाऊस झाला आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव अहमदनगरमधील उत्तरेतील भागांत अवकाळी पावसाने चांगलंच झोडपलंय. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या गहू, हरबरा, द्राक्ष, टरबूज, खरबूज पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.
मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; व्यापाऱ्यांना मिळणार मोठा दिलासा
दरम्यान, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं असून उद्या धुळवड आहे सर्वांनी जल्लोषात साजरी करण्याचं आवाहनही त्यांनी राज्यातील जनतेला केलं आहे.